Agriculture news in marathi From Raver Banana departs for Delhi | Agrowon

रावेरातून केळी दिल्लीला रवाना

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

जळगाव ः रावेर (जि. जळगाव) येथून अनेक वर्षानंतर रेल्वे वॅगनमधून २३ टन केळीची पाठवणूक दिल्ली येथील आझादपूर बाजारातील व्यापाऱ्यांपर्यंत पोचली आहे. केळी वाहतूक सुकर होण्यास मदत झाल्याने बाजार सावरण्यास मदत होणार आहे. 

जळगाव ः रावेर (जि. जळगाव) येथून अनेक वर्षानंतर रेल्वे वॅगनमधून २३ टन केळीची पाठवणूक दिल्ली येथील आझादपूर बाजारातील व्यापाऱ्यांपर्यंत पोचली आहे. केळी वाहतूक सुकर होण्यास मदत झाल्याने बाजार सावरण्यास मदत होणार आहे. 

नुकतीच २३ टन केळीची १५ किलोच्या बॉक्‍समध्ये पॅकींग करून आझादपूर येथील बाजारात पाठवणूक झाली. तेथील खरेदीदारांकडे ही केळी रविवारी (ता. १९) पोचली. केळीच्या पॅकींगसाठी श्‍याम फ्रूट कंपनी, सावदा (ता. रावेर) यांची मदत मिळाली. केळी रावेर रेल्वे स्टेशन येथे मालवाहू वॅगन (पार्सल यान) मध्ये भरण्यात आली. ही वॅगन पणन मंडळ, कृषी विभाग यांच्या मदतीने उपलब्ध झाली. 

सुमारे ७३ हजार रुपये भाडे या संबंधी संबंधितांना द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यालाही चांगला दर या उपक्रमामुळे मिळणार आहे. रावेरातून केळीची रेल्वेद्वारे पाठवणूक अनेक वर्षांपासून बंद होती. रेल्वे वॅगनचे अधिकचे भाडे, दंड व इतर कारणांमुळे ही पाठवणूक बंद झाली होती. अलिकडे ‘कोरोना’च्या संकटात ट्रकभाडे वधारले आहे. ते खरेदीदार, व्यापाऱ्यांना परवडत नाही. यामुळे केळी दरांवरही दबाव वाढत होता. या स्थितीत खरेदीदार व पणन मंडळाच्या पुढाकाराने रेल्वे वॅगनमधून केळीची पाठवणूक झाली. 

दिल्ली येथील आझादपूरच्या बाजारात केळीचा उठाव वाढला तर रेल्वेने केळी पाठवणूक वाढू शकते. निंबोल (ता. रावेर) व इतर भागातील शेतकरी, संस्थादेखील रेल्वेद्वारे केळी पाठविण्यासंबंधी नियोजन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

केळीची रावेरातून अनेक वर्षानंतर रेल्वे वॅगनमधून पाठवणूक झाली आहे. एका वॅगनचे ७३ हजार भाडे द्यावे लागणार आहे. केळीची काढणी वाहतूक व इतर समस्यांमुळे ठप्प होती. वॅगन उपलब्ध झाल्याने ही वाहतूक सुकर होण्यास मदत मिळाली आहे. पणन मंडळ, कृषी विभागाचे सहकार्य यासाठी मिळाले. 
- वैभव महाजन, केळी खरेदीदार, सावदा, ता. रावेर 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...