agriculture news in marathi, ravikant tupkar agin enter in swabhimani shetkari sanghatna, kolhapur, maharashtra | Agrowon

रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`त प्रवेश

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडणे ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती. शेतकऱ्यांनी मला माफ करावे. येथून पुढे चळवळीच्या सगळ्या आंदोलनात सक्रिय राहून अधिक आक्रमकता दाखवू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी जोरदार लढू.
- रविकांत तुपकर.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत कुरबुरीला कंटाळून संघटनेतून बाहेर पडलेल्या रविकांत तुपकर यांनी पुन्हा ‘यू टर्न’ घेत बुधवारी (ता. १६) अचानक स्वगृही प्रवेश केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बैठकीत त्यांनी हा प्रवेश केला. रविकांत तुपकर यांनी पंधरवड्यापूर्वी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला होता. मात्र, आता तुपकर यांचा ‘स्वाभिमानी’तील प्रवेश सदाभाऊ खोत यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना श्री. तुपकर म्हणाले, की संघटनेत अंतर्गत कुरबुरी वाढल्या होत्या. मला पदाचा कोणताही लोभ नव्हता आणि नाही. श्री. शेट्टी यांनी सांगूनही कुरबुरी थांबत नव्हत्या. त्यामुळे चिडून मी राजीनामा दिला. कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. पण, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. अनेक कार्यकर्त्यांनी भावनिक साद घातली. अखेर चळवळ महत्त्वाची मानून मी स्वगृही आलो आहे. येथून पुढे संघटनेच्या उमेदवाराबरोबरच कााँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेगाने सुरवात करणार आहे. श्री. शेट्टी म्हणाले, की संघटनेत काही ताणतणाव आहेत. पण, सध्याची परिस्थिती पाहता हे अंतर्गत वाद मिटवून आम्ही तुपकर यांच्या साथीने पुन्हा चळवळ जोरदार करू. 
 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...