Agriculture news in marathi; Ravikant Tupkar along with MLA Bhui farmers on dam | Agrowon

तुपकरांसह आमदार भुयार शेतकऱ्यांच्या बांधावर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व आमदार देवेंद्र भुयार यांनी मंगळवारी (ता. ५) शेतकऱ्यांच्या बांधावर पोचून नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सभागृहात मागणी रेटून धरण्यासह रस्त्यावर उतरून लढा देऊ, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांनी या संकटकाळी खचून न जाता धैर्याने सामना करावा, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना धीरदेखील दिला. सरसकट नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रस्त्यावरची लढाईदेखील करावी लागणार आहे, त्यासाठी तयार राहा असे आवाहनदेखील त्यांनी केले.

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर व आमदार देवेंद्र भुयार यांनी मंगळवारी (ता. ५) शेतकऱ्यांच्या बांधावर पोचून नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी सभागृहात मागणी रेटून धरण्यासह रस्त्यावर उतरून लढा देऊ, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांनी या संकटकाळी खचून न जाता धैर्याने सामना करावा, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना धीरदेखील दिला. सरसकट नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रस्त्यावरची लढाईदेखील करावी लागणार आहे, त्यासाठी तयार राहा असे आवाहनदेखील त्यांनी केले.

रविकांत तुपकर व आमदार देवेंद्र भुयार यांनी सोमवारी (ता. ४) मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन केल्यानंतर मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पोचून नुकसानीची पाहणी केली. मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख, गणपूर व लोणार तालुक्यांतील अंजणी खुर्द, शिवणी पिसा, चिखली तालुक्यातील पेठ, मेरा बुद्रुक व बुलडाणा तालुक्यातील सावळा, भादोला, वाडी, वरवंड, डोंगर खंडाळा आदी गावांचा दौरा करत शेतकऱ्यांना धीर दिला. गत १५ दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले आहेत. त्यातच ३१ ऑक्टोबर, तसेच १ व २ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीने सर्वच नदी, नाल्यांना महापूर आला. काही ठिकाणी शेतातील उभी पिके वाहून गेली, तर काही ठिकाण सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्या. अनेक जनावरे वाहून गेली, जमिनी खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

संपूर्ण खरीप हंगामच पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना तातडीने भरघोस मदत देण्याची गरज आहे. शासनाने कोणतीच अट न लादता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी येत्या सोमवारी (ता. ११)  चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करावा, असे आवाहनदेखील या दौऱ्यात रविकांत तुपकर व आमदार देवेंद्र भुयार यांनी केले. या वेळी  ''स्वाभिमानी''चे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इतर बातम्या
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
अकोला : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन...अकोला ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
डॉ. सूर्या गुंजाळ यांना केद्राई जीवन...नाशिक  : जिल्ह्यातील नांदूर खुर्द (ता. निफाड...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
सांगलीत तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरूसांगली : नाफेड व स्टेट महाराष्ट्र स्टेट-को-ऑप....
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...