रविकांत तुपकर यांना पुण्यात अटक

रविकांत तुपकर यांना पुण्यात अटक
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटक

पुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते १२ दुधाच्या गाड्यांची व टँकरची तोडफोड झाली होती. या तोडफोडच्या घटनांना जबाबदार धरत पुणे पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, सुजित हांडे, अमर पाटील यांच्यावर मंगळवारी (ता. १७) गुन्हे दाखल केले होते. मंगळवारी (ता. १७) पुणे विश्रामगृह येथून अमोल हिप्परगे व अमर पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यांनतर दोघांना बुधवारी (ता. १८) ३१ जुलैपर्यंतचा जमीन मंजूर केला होता. परंतु रविकांत तुपकर यांनी पोलिसांना हुलकावणी देत भूमिगत होऊन आंदोलन हाताळले. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली मंगळवारपासून (ता. १७) युद्धपातळीवर त्यांचा शोध सुरूच ठेवला होता. रविकांत तुपकर यांच्या शोधासाठी पोलिसांनी पुणे परिसरात ७ ते ८ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. परंतु त्यांना अपयश आले होते. अखेर शुक्रवारी (ता. २०) रविकांत तुपकर यांना अटक केली. त्यानंतर रविकांत तुपकर, प्रल्हाद इंगोले व इतर कार्यकर्त्यांना पुणे लष्कर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता न्यायालयाने श्री. तुपकर व सहकाऱ्यांना ३१ जुलैपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com