agriculture news in marathi, ravikant tupkar demand for resignation of co-operation minister, solapur, maharashtra | Agrowon

सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : रविकांत तुपकर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर कारखानदार जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत. कायद्यानुसार १४ दिवसांत एफआरपी जमा करणे आवश्‍यक असताना, राज्यात यंदा ५३२० कोटी ३६ लाखांची थकबाकी राहिली आहे. त्यात ज्यांच्यावर या सगळ्या विभागाच्या नियंत्रणाची जबाबदारी आहे. त्या सहकारमंत्र्यांच्या कारखान्याकडेच तब्बल ७७ कोटींची थकबाकी आहे. संबंधित कारखानदारांवर कारवाई तर झाली पाहिजेच; पण स्वतःच्या कारखान्याकडे कोट्यवधींची थकबाकी ठेवणाऱ्या सहकारमंत्र्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोलापुरात बुधवारी (ता. २३) केली.

सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर कारखानदार जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत. कायद्यानुसार १४ दिवसांत एफआरपी जमा करणे आवश्‍यक असताना, राज्यात यंदा ५३२० कोटी ३६ लाखांची थकबाकी राहिली आहे. त्यात ज्यांच्यावर या सगळ्या विभागाच्या नियंत्रणाची जबाबदारी आहे. त्या सहकारमंत्र्यांच्या कारखान्याकडेच तब्बल ७७ कोटींची थकबाकी आहे. संबंधित कारखानदारांवर कारवाई तर झाली पाहिजेच; पण स्वतःच्या कारखान्याकडे कोट्यवधींची थकबाकी ठेवणाऱ्या सहकारमंत्र्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोलापुरात बुधवारी (ता. २३) केली.

श्री. तुपकर म्हणाले, की दुष्काळी परिस्थिती, हुमणीचा प्रादुर्भाव यामुळे ऊस उत्पादक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनेने आंदोलनात थोडासा संयम बाळगला, पण कारखानदार त्याचा गैरफायदा घेत आहेत. एफआरपी देण्यात अडचण आहे, तर सरकारने मदत करावी. स्वतः मुख्यमंत्र्यांनी वारणेच्या सभेत साखरेचा दर ३४०० रुपये क्विंटलपर्यंत स्थिर ठेवतो, असे आश्‍वासन दिले होते. पण आज २९०० रुपयांवर साखर आहे. मग आपल्या आश्‍वासनाचे काय झाले? एकट्या सोलापुरात एफआरपीची रक्कम हजार कोटींच्या घरात आहे. चौदा दिवसांच्या आत एफआरपी देण्याच्या मुद्द्यावर कारखानदारांवर कारवाई तर कराच, पण थकलेल्या बिलावर १५ टक्के व्याजाप्रमाणे पैसेही मिळाले पाहिजेत, पण कारवाई कोण आणि कशी करणार? साखर आयुक्त कार्यालय सरकारचे बाहुले बनले आहे. दस्तुरखुद्द सहकारमंत्र्यांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. मंत्री जर का कायदे मोडत असतील, तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. 

कारखान्यांनी एकरकमी एफआरपीबाबत घेतलेल्या भूमिकेचा निषेध आणि सरकारकडून कारवाईसाठी होत असलेली चालढकल आम्ही सहन करणार नाही, त्यासाठीच येत्या सोमवारी (ता. २८) साखर आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...