तुपकर यांचा ‘रयत क्रांती’त प्रवेश

रविकांत तुपकर यांचा ‘रयत क्रांती’त प्रवेश
रविकांत तुपकर यांचा ‘रयत क्रांती’त प्रवेश

मुंबई  : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिलेल्या रविकांत तुपकर यांनी शनिवारी (ता.२८) रयत क्रांती संघटनेत जाहीर प्रवेश केला. संघटनेचे संस्थापक आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा कार्यक्रम पार पडला.

माजी खासदार राजू शेट्टी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणाऱ्या श्री.तुपकर यांनी अचानकपणे संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी मुंबईत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी तुपकर यांचे समर्थक कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रयत क्रांती संघटनेचा हा कार्यकर्ता मेळावा आणि प्रवेशाचा संयुक्त कार्यक्रम होता. कार्यक्रमाला संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. तुपकर हे बुलडाण्यातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. त्या वेळी ही जागा पदरात पाडून घेण्यात राजू शेट्टी यांना अपयश आले. आताही बुलडाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातून श्री. तुपकर इच्छुक आहेत. ही जागा सध्या काँग्रेसकडे आहे. त्यामुळे संघटनेला ही जागा मिळणे दुरापास्त आहे. यातूनच नाराज रविकांत तुपकर यांनी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यानुसार त्यांनी पूर्वाश्रमीचे सहकारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संघटनेत प्रवेश केला आहे.

कदाचित, भाजप रयत क्रांती संघटनेला ही जागा सोडण्याची शक्यता असून, या ठिकाणाहून तुपकर हे युतीतर्फे रयत क्रांती संघटनेचे उमेदवार राहू शकतात, अशी चिन्हे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com