agriculture news in marathi, Ravikant Tupkar will be new state head for Swabhimani Shetkari Party | Agrowon

स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी तुपकर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे/बुलडाणा : देहू येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत गुरुवारी (ता.१२) सर्वानुमते स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  

पुण्यातील पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनीही माहिती दिली. दरम्यान, तुपकर यांच्या निवडीमुळे विदर्भात संघटना वाढीला बळ मिळेल, असे शेट्टी यांनी सांगितले.  

पुणे/बुलडाणा : देहू येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत गुरुवारी (ता.१२) सर्वानुमते स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  

पुण्यातील पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनीही माहिती दिली. दरम्यान, तुपकर यांच्या निवडीमुळे विदर्भात संघटना वाढीला बळ मिळेल, असे शेट्टी यांनी सांगितले.  

आक्रमक आंदोलक..
रविकांत तुपकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी केली. ही संघटनावाढीसाठी कठोर परिश्रम घेतले. सावळा या छोट्याशा गावात जन्मलेले रविकांत तुपकर यांनी कॉलेज जीवनापासून तरुणांना सोबत घेऊन शेतकरीपुत्रांच्या हक्कासाठी सुरवातीला लढा उभा केला. गावातील पाणीटंचाई असो, की शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या समस्या असोत, त्या प्रशासनापर्यंत पोचवून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी तुपकर यांनी आक्रमकपणे आंदोलने केली.

पुढे ते शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या संपर्कात आले. एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून तुपकरांची ओळख निर्माण झाली होती. या तरुणात नेतृत्वाचे गुण असल्याचे हेरून शरद जोशी यांनी तुपकर यांना संघटनेत काम करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करीत त्यांनी पाठीशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रस्थापित राजकीय पक्ष व नेत्यांना शह देत बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देणे सुरू केले. त्यांच्या या आक्रमक व आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे प्रशासन व शासनकर्त्यांना जेरीस आणले होते.

पुढे रविकांत तुपकर आणि आंदोलन असे समीकरण निर्माण झाले. नंतरच्या काळात राजू शेटृी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली, त्या वेळी ते राजू शेट्टी यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दाखल झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांची अनेक आंदोलने चांगलीच गाजली. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणून रविकांत तुपकर यांनी तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या व विरोधी पक्षांच्या नेत्यांना सळो की पळो करून सोडले होते. खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर अशा या त्रिकुटाने सरकारलासुद्धा जेरीस आणले होते. प्रभावी वक्ता, कुशल संघटक, आक्रमक व तितकेच अभ्यासू व वैचारिक बैठक असलेले रविकांत तुपकर यांनी कमी वयात परिपक्व नेता म्हणून महाराष्ट्रभर ओळख निर्माण केली. खा. शेट्टी हे तुपकरांना माढा किंवा बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून उतरविण्याची तयारी करीत आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...