agriculture news in Marathi raw sugar export beneficial this year Maharashtra | Agrowon

कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर 

टीम अॅग्रोवन
रविवार, 8 ऑगस्ट 2021

येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दर चांगला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने यंदा कच्च्या साखरेच्या निर्यातीची संधी भारताला उपलब्ध झाली आहे.

कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला दर चांगला मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने यंदा कच्च्या साखरेच्या निर्यातीची संधी भारताला उपलब्ध झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने कच्या साखरेस चांगले दर मिळू शकतात. पुरेशा प्रमाणात साखरनिर्यात झाल्यास देशातील स्थानिक साखर विक्रीवरील दबाव कमी होणार आहे. कारखान्यांची हंगामात ऐनवेळी पळापळ होऊ नये यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानेही हंगाम सुरू होण्यापूर्वीच कच्ची साखरनिर्यात करार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

गेल्या दोन वर्षांपासून देशाने साखरनिर्यातीत समाधानकारक कामगिरी केली आहे. अनुदान मिळणार असल्याने अनेक कारखान्यांनी साखर निर्यातीला प्राधान्य दिले. यामुळे ५५ लाखांहून अधिक टन साखरनिर्यात झाली. चांगला दर मिळाल्याने कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिले. गेल्या वर्षी निर्यात अनुदान योजना उशीर म्हणजे डिसेंबरमध्ये जाहीर झाल्याने कारखान्यांना साखर निर्यातीसाठी धावाधाव करावी लागली. यंदा ही धावाधाव टाळण्यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने कारखान्यांना एक पत्र लिहून कारखान्यांनी कच्ची साखर तयार करण्याला प्राधान्य द्यावे व त्याचे करार करून ती जास्तीत जास्त निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. 

पक्क्या साखरेच्या तुलनेत कच्ची साखर जास्त वेळ साठा करून ठेवता येत नाही. आपण जितकी कच्ची साखर तयार करणार आहोत. तितक्या साखरेचे करार आत्तापासूनच बाहेरच्या देशाशी करावेत, जशी साखर तयार होईल तशी ती साखर पाठवल्यास बाजारात असणाऱ्या चांगल्या दराचा फायदा साखर कारखान्यांना होऊ शकतो, असे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

यंदाही विक्रमी साखर उत्पादन होणार असल्याने या पार्श्‍वभूमीवर आतापासूनच नियोजन केल्यास साखर विक्रीचा ताण कमी होऊ शकेल असे राष्ट्रीय साखर सहकारी साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रातून कराराला पसंती 
साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षासाठी निर्यात कराराला महाराष्ट्रातून अधिक पसंती आहे. राज्यातून हंगाम २०२१-२२ करिता कच्ची साखरेचे (रॉ शुगर) ओपन जनरल लायसन्स (ओजीएल) योजनेअंतर्गत अंदाजे पाच लाख टनांचे करार झाले आहेत. करार केलेली साखर नोव्हेंबर व डिसेंबर २०२१ या कालावधीत निर्यात होईल. हे साखरनिर्यात करार अंदाजे २९०० ते २९५० प्रति क्विंटल एक्स मिल या दराने फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने झाले आहेत. 

ब्राझीलमध्ये अंदाजे ५० लाख टन साखर मागील हंगाम पेक्षा कमी उत्पादन होईल असा अंदाज आहे. थायलंड मध्ये २०२१-२२ हंगामात मागील वर्षापेक्षा पंधरा लाख टन साखर जादा उत्पादन होण्याची शक्यता आहे. येत्या वर्षभरात जागतिक बाजारात अंदाजे ४० लाख टन साखरेची कमतरता राहू शकते. यामुळे जागतिक बाजारात भारतीय कारखानदारांना साखरनिर्यातीची संधी उपलब्ध झाली आहे. 

...अशी आहे राज्याची स्थिती 
निर्यातदार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील साखर कारखाने मागील सहा ते सात मे महिन्यापासून देशांतर्गत किमान साखर विक्री दराच्या (एमएसपी) कमी दराने साखर विक्री करत आहेत, ओपन जनरल लायसन अंतर्गत साखरेला जर २९५० प्रती क्विंटल पेक्षा जास्त दर मिळू लागला तर जास्तीत जास्त कारखाने निर्यातीला साखर देण्यास प्राधान्य देऊ लागतील यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर वाढण्यास मदत होईल याचा सरकारने व कारखानदारांनी विचार करावा २०२०-२१ मध्ये सरकारने जाहीर केलेल्या ६० लाख टन साखर निर्यात अनुदान योजनेपैकी अंदाज तीस लाख टनांपेक्षा जास्त साखर महाराष्ट्रातून निर्यात झाली. तसेच हंगाम २०२१-२२ करिता ओपन जनरल लायसन अंतर्गत झालेले पाच लाख टन साखर निर्यातीचे करार हे महाराष्ट्रातून झालेले आहेत. राज्यात यंदाच्या हंगामात ११५ लाख टना पेक्षा जास्त साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. 

प्रतिक्रिया 
कारखान्यांनी सध्या पक्क्या साखरेऐवजी कच्च्या साखरेच्या निर्मितीचे नियोजन करावे. त्याच्या निर्यातीचे करार आताच करावेत यासाठी आम्ही आग्रही आहोत, कारखान्यांनी पक्की साखर तयार करून बँकेचा बोजा वाढवण्यापेक्षा कच्ची साखर तयार करावी व ती तातडीने निर्यात करावी, अशी आमची अपेक्षा आहे. या आवाहनाला कारखान्यांनी पसंती दिली आहे ही समाधानाची बाब आहे. 
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ. 

राज्यातील कारखान्यांना बंदरापर्यंत साखर वाहतूक खर्च कमी आहे. त्यामुळे सरकारने निर्यात अनुदान योजनेऐवजी ओपन जनरल लायसन्स अंतर्गत साखर निर्यातीस परवानगी दिली तर महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यातून अंदाजे ४५ लाख टनांपेक्षा जास्त साखरनिर्यात होऊ शकेल. जर सरकारने देशांतर्गत किमान विक्री मूल्य (एमएसपी) वाढवली नाही, तसेच निर्यात अनुदान नाही दिले तरी २९५० रुपये प्रती क्विंटल पेक्षा जास्त दर साखर निर्यातीला मिळू शकेल. 
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार 


इतर अॅग्रो विशेष
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...
उन्हाळी कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे...नाशिक : साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात २५ हजार कृषिपंपांची वीज...जळगाव ः  जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय...
सोयाबीन वायद्यांत सुधारणापुणे ः बाजारात सोयाबीनचे दर पडल्यानंतर केंद्रीय...
‘फॅसिझमविरोधात लढण्यास  सक्षम पर्याय...मुंबई : देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास...
आझाद मैदानावर बुधवारपासून  गट सचिवांचे...सांगली ः राज्यातील गट सचिवांचे सेवा व वेतनाचे...
विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
पीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल पुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा...
फळबाग, जिरॅनियम प्रक्रियेतून शाश्‍वत...नागठाणे (जि. सातारा) येथील सुनील हणमंत साळुंखे...
अभ्यासपूर्ण शेतीतून मिळवले हंगामी...मालेगाव (जि. वाशीम) येथील सय्यद शारीक सय्यद गफूर...
बदलत्या वातावरणात द्राक्ष बागेचे...पावसामुळे बागेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे....
२४० एकरांसाठी सामुहिक स्वयंचलित ठिबक...ऊस व द्राक्षे या पिकांसाठी प्रसिद्ध अहिरवाडी (जि...
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न...नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी...
हळदीचे दर स्थिर सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती...