कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढ
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढ

कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढ

जागतिक बाजारपेठेत कच्च्या व पक्‍या दोन्ही साखरेची मागणी कायम आहे. दोन्ही साखरेच्या दरात समाधानकारक वाढ होत आहे. ही कारखानदारांसाठी चांगली संधी आहे. - विश्‍वजित शिंदे, साखरतज्ज्ञ

कोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. कच्च्या साखरेचे दर सध्या प्रति पौंड १४.९ सेंट्स (३१९.६६ डॉलर्स प्रति टन) इतक्‍या पातळीवर पोचले आहेत. लवकरच हे दर १५ सेंट्सपर्यंत जातील, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला. गेल्या दोन वर्षातील हा दराचा उच्चांक असल्याचे साखर बाजारातील सूत्रांनी सांगितले.  सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची चणचण भासू लागली आहे. याचा परिणाम कच्च्या साखरेच्या किंमत वाढीवरही होत आहे. सहा महिन्यापूर्वी ११ ते १२ सेंट्स इतकी किंमत कच्च्या साखरेला मिळत होती. जानेवारी मध्यानंतर त्यात तब्बल २ सेंटसनी वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेली तूटच या साखर दरवाढीस कारणीभूत ठरत असल्याने साखर उद्योगासाठी ती फायदेशीर ठरणार असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.  जागतिक बाजारपेठेत सध्या ६० ते ७० लाख टन साखरेची कमतरता भासत आहे. या बाजारपेठेतील साखरेचे दर हे प्रामुख्याने ब्राझील, भारत, आस्ट्रेलिया, थायलंडच्या साखर उत्पादनावर अवलंबून असतात. गेल्या वर्षामध्ये ब्राझीलचे साखर उत्पादनही फारसे वाढले नव्हते. ब्राझीलने साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिले होते. याचबरोबर थायलंडमध्येही अशीच स्थिती होती. सध्या भारतातही साखरेचे उत्पादन कमीच होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात जानेवारी अखेरपर्यंत २४ टक्क्‍यांनी घट झाली आहे. भारतातही साखर कमी उत्पादित होण्याची शक्‍यता आहे. या साऱ्याचा परिणाम कच्ची साखरेच्या दरात वाढ होण्यात झाला आहे.  आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या अपेक्षेनुसार २०२०-२१ मध्ये साखरेची तूट साडेतीन लाख दशलक्ष टनापर्यंत कायम राहील. ब्राझीलचा हंगाम एप्रिलला सुरू होण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत जागतिक बाजारपेठेत साखरेची चणचण कायम राहील. यामुळे साखर निर्यातीला चांगला वाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com