agriculture news in Marathi raw sugar rate record high Maharashtra | Agrowon

कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढ

राजकुमार चौगुले
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

जागतिक बाजारपेठेत कच्च्या व पक्‍या दोन्ही साखरेची मागणी कायम आहे. दोन्ही साखरेच्या दरात समाधानकारक वाढ होत आहे. ही कारखानदारांसाठी चांगली संधी आहे. 
- विश्‍वजित शिंदे, साखरतज्ज्ञ

कोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. कच्च्या साखरेचे दर सध्या प्रति पौंड १४.९ सेंट्स (३१९.६६ डॉलर्स प्रति टन) इतक्‍या पातळीवर पोचले आहेत. लवकरच हे दर १५ सेंट्सपर्यंत जातील, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला. गेल्या दोन वर्षातील हा दराचा उच्चांक असल्याचे साखर बाजारातील सूत्रांनी सांगितले. 

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेची चणचण भासू लागली आहे. याचा परिणाम कच्च्या साखरेच्या किंमत वाढीवरही होत आहे. सहा महिन्यापूर्वी ११ ते १२ सेंट्स इतकी किंमत कच्च्या साखरेला मिळत होती. जानेवारी मध्यानंतर त्यात तब्बल २ सेंटसनी वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेली तूटच या साखर दरवाढीस कारणीभूत ठरत असल्याने साखर उद्योगासाठी ती फायदेशीर ठरणार असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

 जागतिक बाजारपेठेत सध्या ६० ते ७० लाख टन साखरेची कमतरता भासत आहे. या बाजारपेठेतील साखरेचे दर हे प्रामुख्याने ब्राझील, भारत, आस्ट्रेलिया, थायलंडच्या साखर उत्पादनावर अवलंबून असतात. गेल्या वर्षामध्ये ब्राझीलचे साखर उत्पादनही फारसे वाढले नव्हते. ब्राझीलने साखरेपेक्षा इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिले होते.

याचबरोबर थायलंडमध्येही अशीच स्थिती होती. सध्या भारतातही साखरेचे उत्पादन कमीच होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात जानेवारी अखेरपर्यंत २४ टक्क्‍यांनी घट झाली आहे. भारतातही साखर कमी उत्पादित होण्याची शक्‍यता आहे. या साऱ्याचा परिणाम कच्ची साखरेच्या दरात वाढ होण्यात झाला आहे. 

आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या अपेक्षेनुसार २०२०-२१ मध्ये साखरेची तूट साडेतीन लाख दशलक्ष टनापर्यंत कायम राहील. ब्राझीलचा हंगाम एप्रिलला सुरू होण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत जागतिक बाजारपेठेत साखरेची चणचण कायम राहील. यामुळे साखर निर्यातीला चांगला वाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 


इतर अॅग्रोमनी
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...