Agriculture news in marathi, Of 'Rayat' at Deglaur To hold in front of ‘Mahavitaran’ | Agrowon

देगलूर येथे ‘रयत’चे ‘महावितरण’समोर धरणे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

नांदेड : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथे कार्यकारी अभियंता उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. १४) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

नांदेड : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथे कार्यकारी अभियंता उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी (ता. १४) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

या वर्षी खरीप हंगाम निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया गेला आहे. शेतकरी नव्या जोमाने रब्बी हंगामात पेरणी केली. परंतु, महावितरणच्या कर्मचाऱ्‍यांनी बोगस यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांनी पिके वाळून जातील म्हणून बिले भरले. यानंतरही महावितरण सेवा देण्यास सपशेल अपयशी ठरली आहे. मुखेड तालुक्यातील धामणगाव येथील विजेचे पोल जुलै २०२१ या काळात पडून शेतीचे नुकसान झाले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी या संबंधी आपल्या कार्यालयात तक्रार दिली होती. पण, यावर कोणतीही उपाययोजना झाली नाही. महावितरणच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभारामुळे शेतकऱ्यांवर धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे आंदोलनकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील डी. पी. तत्काळ दुरुस्त करावे, शेतीला दिवसा सलग आठ तास वीज पुरवठा करावा, धामणगाव (ता. मुखेड) येथील लाइट पोल पडल्यामुळे शेतीचे नुकसान झाले. त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी कार्यकारी अभियंता चटलवार यांनी मागण्या लवकर मान्य करू, असे आश्वासन दिले. युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे उपस्थित होते.


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...