रयत क्रांती संघटनेचा मढेवडगावला रास्ता रोको

नगर ः श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव परिसरातील गावांच्या विविध समस्यांबाबत रयत क्रांती संघटनेने नगर-दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. संघटनेचे नेते सागर खोत, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते.
Of Rayat Kranti Sanghatana Stop the road to Madhewadgaon

मढेवडगाव परिसरासह तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटनेतर्फे रास्ता रोको  आंदोलन करण्यात आहे. त्यात राजेंद्र म्हस्के, संतोष ढगे, वसंत उंडे, सुहास मांडे, शरद मांडे, राजेंद्र उंडे, हनुमंत झिट, साहेबराव उंडे, राहुल साळवे आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. 

खोत म्हणाले, ‘‘वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वीजजोड बंद करण्याचा धडाका लावला आहे. कोरोनात शेतकऱ्यांचीही अवस्था वाईट झाली. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे घेणेदेणे नाही. त्यामुळे वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार होतोय. हा तातडीने बंद करा, अन्यथा शेतकरी अधिकाऱ्यांना बसू देणार नाहीत.’’ 

भाऊसाहेब मांडे म्हणाले, ‘‘महावितरण मढेवडगाव परिसरातील बाबुर्डी, शिरसगाव, म्हातारपिंप्री, लोणीव्यंकनाथ, चिंभळे, हंगेवाडी या भागात मनमानी करीत आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com