रयत क्रांती संघटना ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार ः सदाभाऊ खोत

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत

पुणे  ः आगामी विधानसभा निवडणूक रयत क्रांती संघटना ‘कमळ’ चिन्हावर लढविणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा- शिवसेना युती मित्रपक्षांना १८ जागा देणार आहे. या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहिती नंतर रयत संघटना किती जागांवर लढणार याबाबत खोत यांना विचारले असता ते म्हणाले, की रयत क्रांती संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक ६ जून रोजी पुण्यात होणार आहे. यावेळी जिल्हा, तालुका अध्यक्षांकडून आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर मित्रपक्ष असलेल्या रासप, शिवसंग्राम, आरपीआय सोबत चर्चा करून, आमच्या जागांच्या मागण्यांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. यानंतर कोण किती जागा लढणार यावर निर्णय घेतला जाईल.

मात्र रयत संघटना हा राजकीय पक्ष नसून, शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना आहे. त्यामुळे आम्ही आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्या कमळ या चिन्हावरच लढणार आहोत. आगामी विधानसभा मंत्री खोत यांचा मुलगा लढणार का, या प्रश्‍नावर मंत्री खोत यांनी स्मितहास्य करत उत्तर देणे टाळले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com