नामपूर बाजार समितीत ‘रयत’चे आंदोलन

नामपूर, जि. नाशिक : कांदा व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी (ता. १५ ) येथील बाजार समितीच्या आवारात रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
Rayat's agitation in Nampur Bazar Samiti

आंदोलन काळात पावसाची रिपरिप सुरु झाल्याने मंडपाभोवती ताडपात्री टाकून आंदोलन सुरु होते. मागण्याबाबत आंदोलक शेतकरी व संचालक मंडळात शाब्दिक चकमक झाली. 

कांद्याचे शेतकऱ्यांना रोख स्वरुपात पेमेंट मिळावे, जिल्हयातील अन्य मार्केटप्रमाणे कांद्याचे सरासरी दर असावे, डाळिंब लिलावानंतर दोन टक्के पेमेंट कपात करू नये आदी मागण्या करण्यात आल्या. रयत संघटनेचे दिपक पगार, बाजार समितीचे संचालक अविनाश सावंत यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.  सभापती संजय भामरे, जेसी गटाचे नेते विलास सावंत उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com