agriculture news in marathi Rayat's awakening for the victims in Solapur | Agrowon

सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे जागरण-गोंधळ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

सोलापूर :रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. 

सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेली पिके पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत पावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार म्हणून तातडीची मदत द्यावी, पीक नुकसानीबद्दल प्रतिहेक्टर ५० हजार रुपये, तर बागायत पिकांना १ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली.
संघटनेचे अध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले.

गेल्या वर्षीही परतीच्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती करीत आतापर्यंतचा सर्वात मोठा पाऊस पडला आहे. हजारो शेतकऱ्यांची पिके पाण्यात वाहून गेली आहेत. अनेकांच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. बांध, भराव फुटल्याने जमिनीवरील माती वाहून गेली आहे. यामुळे सरकारने पंचनामे, पाहणी दौरा थांबवून तातडीची मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांचे शेती पंपाचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

संबळ अन् डपलीचा गजर 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी पूजा करून आंदोलकांनी जागरण, गोंधळ घातले. संबळ व डपलीचा गजर करीत शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामध्ये सुहास पाटील, छगन पवार, सोमा भोसले, सुनील पाटील, राहुल बिडवे, सोमा पाटील, बळिराम गायकवाड, सुधाकर पांढरे, अमोल गवळी, दत्तात्रेय गायकवाड, प्रशांत करळे, अण्णा जाधव आदी उपस्थित होते.


इतर बातम्या
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...
सरसकट पीकविम्यासाठी महाजनआंदोलन उभारणारनांदेड : खरिपातील पिकांचा सरसकट विमा...
पुण्यातील रायफल एक्स्पर्ट काढणार...आष्टी, जि. बीड : बिबट्यांच्या उच्छादाने आष्टी...
‘गंगाखेड’ला परवाना देण्यासाठी...परभणी : गंगाखेड शुगर कारखान्यास यंदाच्या हंगामात...
शेतीला रात्रीची नको, दिवसा वीज द्यापुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील महावितरण...
नगर जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्राकडे...नगर : हमीभावाने मूग, सोयाबीन, उडदाची खरेदी...
सरकारी गोदामे भरली; संग्रामपूर,...बुलडाणा : जिल्ह्यात या हंगामात सुरू केलेली...
माणमध्ये रब्बीची ४३ हजार हेक्‍टरवर...कुकुडवाड, जि. सातारा : माण तालुक्‍यात यंदा...
सिंधुदुर्गमध्ये ३७५ बंधारे पूर्णसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई...
सागंलीत दिवाळीपूर्वी नाही मिळाली मदत सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी...
अमरावतीत ८८ हजार हेक्‍टरवर रब्बीची लागवडअमरावती : संततधार पाऊस, अतिवृष्टी आणि त्यानंतर...
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्नघाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी...
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठाआजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही...
गोंदियात ३५ कोटींवर धान खरेदी गोंदिया : जिल्ह्यात दिवाळीनंतर हमीभाव केंद्रांवर...
धान बारदानाचे २५ कोटी थकीतगडचिरोली :  शेतकऱ्यांकडून घेतलेल्या...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...