agriculture news in Marathi RBI control for remove co operative Maharashtra | Agrowon

‘आरबीआय’चे नियंत्रण सहकार मोडीत काढण्यासाठीच : शरद पवार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण वाढवून देशातील सहकार चळवळ हळूहळू मोडीत काढण्याकडे केंद्र सरकार वाटचाल करत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत आहे.

सातारा : सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण वाढवून देशातील सहकार चळवळ हळूहळू मोडीत काढण्याकडे केंद्र सरकार वाटचाल करत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत आहे. यावर कोरोनामुळे देशातील जनता सर्व काही सहन करतेय, अशीच भावना त्यांची झाली आहे. जनतेच्या भावनांचा गैरफायदा केंद्र सरकार घेत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर केली.

खासदार शरद पवार शनिवारी (ता. २७) रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने सातारा दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. खासदार पवार म्हणाले, की सहकारी संस्थांवर रिझर्व्ह बॅंकेचे नियंत्रण वाढविले आहे. यातून देशातील सहकार चळवळ हळूहळू मोडीत काढण्याकडे केंद्र सरकार वाटचाल करत आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत, या प्रश्‍नावर त्यांनी कोरोनात सोशल डिस्टिन्सिंग पाळले जाणार नाही परिणामी संसर्ग वाढण्याची भीती असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, तो योग्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

इंधनदरवाढीच्या प्रश्‍नावर बोलताना श्री. पवार म्हणाले, ‘‘पेट्रोल व डिझेलची दरवाढ दररोज होत आहे. भारताच्या इतिहासात इतक्‍या मोठ्याप्रमाणात इंधन दरवाढ पाहिली नव्हती. देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. इंधन दरवाढीचा सर्वाधिक परिणाम सर्वसामान्यांसह विविध घटकांवर दिसत असतो. पण, लॉकडाउनच्या काळात लोकांनी शासनाच्या विरोधात बोलणे सोडले आहे. त्याऐवजी परिस्थितीशी दोन हात करत जनता सर्व काही सहन करत आहे. जनता सर्व काही सहन करतेय अशीच भावना निर्माण मोदी सरकारची झाली आहे. जनतेच्या भावनेचा गैरफायदा केंद्र सरकार घेतंय.’’

भारत-चीनचा मुद्दा संवेदनशील
भारत-चीनचा मुद्दा सध्या संवेदनशील बनला आहे. त्यामुळे १९६२ च्या भारत-चीन युध्दानंतर ४७ हजार किलोमीटरची आपली भूमी चीनने ताब्यात घेतली आहे. ती आज घेतलेली नाही. त्यामुळे देशाच्या सुरक्षेबाबत राजकारण नको, हा प्रश्‍न राजकारणाच्या पलीकडचा आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. भारत-चीन मधील संबंध सध्या दुरावलेले आहेत. यामध्ये भारत कमी पडला का, या प्रश्‍नावर श्री. पवार म्हणाले, मुळात भारत चीनचा प्रश्‍न हा संवेदशील आहे.

गलवान खोऱ्यातून जाणारा रस्ता भारताने बनविलेला आहे. या रस्त्यावरून आपण सियाचिनमधील आपल्या भूभागात जाण्यासाठी वापर केला जातो. या रस्त्याच्या एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला आपण आहोत. हा रस्ता भारताचा असूनही चीन सैन्य या काही वेळेसाठी रस्त्यावर येते. त्या वेळी दोन्हीकडच्या सैन्यात धरपकड होते. त्यातून धक्काबुकीचे प्रकार होतात.


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...