agriculture news in Marathi, RCEP may hit Indian Agriculture, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘आरसीईपी’मुळे भारतीय शेतीला धोका शक्य

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पुणे ः रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसीईपी) हा आशियातील दहा देशांमध्ये खुल्या व्यापारासाठी होणारा करार आहे. या व्यापार-करारात प्रामुख्याने आशिया-पॅसिफिकमधल्या १६ देशांचा समावेश आहे, त्यात ‘आसियान’ या संघटनेचे सर्व सदस्य तसेच चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत हे देश आहेत. या करारात सहभागी होणाऱ्या देशांमध्ये जगाची अर्धी लोकसंख्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे ४० टक्के वाटा आहे. आरसीईपी यशस्वी झाल्यास ३.४ अब्ज लोकांचं मार्केट बनेल.

पुणे ः रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसीईपी) हा आशियातील दहा देशांमध्ये खुल्या व्यापारासाठी होणारा करार आहे. या व्यापार-करारात प्रामुख्याने आशिया-पॅसिफिकमधल्या १६ देशांचा समावेश आहे, त्यात ‘आसियान’ या संघटनेचे सर्व सदस्य तसेच चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत हे देश आहेत. या करारात सहभागी होणाऱ्या देशांमध्ये जगाची अर्धी लोकसंख्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे ४० टक्के वाटा आहे. आरसीईपी यशस्वी झाल्यास ३.४ अब्ज लोकांचं मार्केट बनेल.

आरसीईपी करारासंदर्भात चर्चेच्या १६ फेऱ्या झाल्या आहेत. या कराराला सध्या सुरू असलेल्या आशियानच्या परिषदेत अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. आरसीईपी हा खुला करार असल्याने यात सहभागी होणाऱ्या देशांमध्ये विनाआयात शुल्क व्यापार होणार आहे. त्यामुळे भारतातील शेतकरी नेते आणि अभ्यासक करारातील अनेक मुद्यांवर प्रश्‍न उपस्थित करून सहभागी न होण्याची मागणी करत आहेत. यात प्रामुख्याने शेती आणि दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात धोक्याची सूचना देण्यात येत आहे. देशातील जवळपास १५० शेतकरी संघटनांनी या कराराला विरोध केला आहे. 

करारात सहभागी होणाऱ्या देशांमध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक विषमता आहे. दरडोई उत्पन्नातही मोठी तफावत असून ऑस्ट्रेलियासारख्या श्रीमंत देशाचं दरडोई वार्षिक उत्पन्न ५५ हजार डॉलर आहे. तर कंबोडियासारख्या देशाचं दरडोई वार्षिक उत्पन्न १३०० डॉलर इतकं आहे. 

शेतकरी संघटनांसह अनेक अभ्यासक आणि जाणकरांनीही या करारात भारताने सहभागी होऊ नये असे सूचित केले आहे. त्यातच करारातील तरतुदी आणि मसुदा जाहीर केला नसल्याने आणि त्यात गोपनियता पाळली जात असल्याने यावरही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीनसारख्या विकसित देशांच्या शेतीमालाला भारताची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्याचा जबर फटका भारतातील शेतीक्षेत्राला बसेल, असा धोका शेतकरी संघटनांनी मांडला आहे.

शेतीविषयक आव्हाने

 •   दुग्ध उत्पादने, रबर, नारळ, काळी मिरी, इलायची, कापूस, साखर, गहू यांची आयात वाढेल
 •   देशातील दूध दराचा प्रश्‍न कायम असताना आयात वाढणे शक्य
 •   ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून डेअरी उत्पादनांच्या आयातीवरून आक्षेप
 •   १० कोटी दूध उत्पादक कुटुंबाच्या जीवनमानावर परिणाम होण्याची भीती
 •   शेतीमालाची करमुक्त आयात होऊन शेतकरी संकटात येतील

भारतापुढील आव्हाने

 •   अमेरिकेसोबत व्यापार युध्द असलेल्या चीनचा आरसीईपीसाठी पुढाकार
 •   चीनी उत्पादनांची मोठी आयातीची भीती
 •   उद्योजक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
 •   इलेक्ट्रॉनिक डेटा शेअरिंग आणि लोकल डेटा स्टोरेजची आव्हान
 •   सुरक्षा आणि गोपनीयतेमुळे माहिती उघड करणं आव्हानात्मक 
 •   देशाच्या घरगुती उत्पादनांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता
 •   व्यापारात मोठी तूट निर्माण होण्याची भीती

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...