बनावट नोटा देऊन फसवणूकीचा प्रकार पुन्हा उघडकीस

अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मोहोळमध्ये एका शेतकऱ्याला शेळ्यांच्या खरेदीपोटी बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता वैराग (ता. बार्शी) येथेही अशीच घटना घडली आहे.
बनावट नोटा देऊन फसवणूकीचा प्रकार पुन्हा उघडकीस
बनावट नोटा देऊन फसवणूकीचा प्रकार पुन्हा उघडकीस

सोलापूर ः अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मोहोळमध्ये एका शेतकऱ्याला शेळ्यांच्या खरेदीपोटी बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता वैराग (ता. बार्शी) येथेही अशीच घटना घडली आहे. येथील आठवडी बाजारात शेळ्या खरेदीनंतर दोघांनी एका शेतकऱ्याला ५०० रुपयांच्या २९ नोटा म्हणजे १४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. वैरागच्या बाजारात गुरुवारी (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी येथील पोलिसांत शेतकऱ्याने तक्रार दिली आहे. तक्रारदार शेतकरी बिभिषण शंकर खेंदाड (रा. वैराग) हे आपली एक शेळी, एक बोकड व कोकरू विक्रीसाठी येथील आठवडी बाजारात घेऊन आले होते. त्या वेळी दोघांनी १५ हजार ५०० रुपयांना शेळ्यांचा सौदा केला. तो ठरल्यानंतर शेळ्या पिकअपमध्ये घातल्या. त्यानंतर शेळ्यांच्या खरेदीपोटी ५०० रुपयांच्या २९ नोटा म्हणजे १४ हजार ५०० रुपये शेतकऱ्याच्या अंगावर टाकून पिकअपसह पलायन केले. त्यानंतर या नोटा खेंदाड यांनी तपासल्या असता, त्या बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. मोहोळमध्येही पाच दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यानंतर आता वैरागमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे अशी फसवणूक करणारी टोळी असण्याचा संशय व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com