agriculture news in marathi Re-expose the type of fraud by giving fake notes | Page 2 ||| Agrowon

बनावट नोटा देऊन फसवणूकीचा प्रकार पुन्हा उघडकीस

अॅग्रोवन वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मोहोळमध्ये एका शेतकऱ्याला शेळ्यांच्या खरेदीपोटी बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता वैराग (ता. बार्शी) येथेही अशीच घटना घडली आहे.

सोलापूर ः अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मोहोळमध्ये एका शेतकऱ्याला शेळ्यांच्या खरेदीपोटी बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता वैराग (ता. बार्शी) येथेही अशीच घटना घडली आहे. येथील आठवडी बाजारात शेळ्या खरेदीनंतर दोघांनी एका शेतकऱ्याला ५०० रुपयांच्या २९ नोटा म्हणजे १४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

वैरागच्या बाजारात गुरुवारी (ता. २१) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी येथील पोलिसांत शेतकऱ्याने तक्रार दिली आहे. तक्रारदार शेतकरी बिभिषण शंकर खेंदाड (रा. वैराग) हे आपली एक शेळी, एक बोकड व कोकरू विक्रीसाठी येथील आठवडी बाजारात घेऊन आले होते. त्या वेळी दोघांनी १५ हजार ५०० रुपयांना शेळ्यांचा सौदा केला. तो ठरल्यानंतर शेळ्या पिकअपमध्ये घातल्या. त्यानंतर शेळ्यांच्या खरेदीपोटी ५०० रुपयांच्या २९ नोटा म्हणजे १४ हजार ५०० रुपये शेतकऱ्याच्या अंगावर टाकून पिकअपसह पलायन केले. त्यानंतर या नोटा खेंदाड यांनी तपासल्या असता, त्या बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. मोहोळमध्येही पाच दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यानंतर आता वैरागमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे अशी फसवणूक करणारी टोळी असण्याचा संशय व्यक्त होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
‘मनरेगा’च्या मजुरांना मजुरी मिळेना, दोन...पुणे : आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील अनेक मजुरांनी...
पंढरपुरातील माघी यात्रेचा आजचा सोहळा...सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी-...
वाढत्या कोरोनामुळे बाजारांवर मर्यादा अकोला ः दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये...
सातारा जिल्ह्यात नियमीत कर्ज फेडणारे...कऱ्हाड, जि. सातारा ः सरकारने पीककर्जाची नियमीत...
पीक कर्ज फेडणाऱ्यांना लवकरच परतावा :...पुणे ः ‘‘महाविकास आघाडी सरकारने पीककर्जाची वेळेवर...
सगरोळीत निकृष्ट चाऱ्यावर दर्जेदार...नांदेड : ‘‘मराठवाड्यात बहुतांश शेतकरी तूर, मूग,...
भात खरेदी केंद्राकडून ९५० क्विंटल खरेदी आजरा, जि कोल्हापूर : मार्केटिंग फेडरेशनने आजरा...
दूध उत्पादक, डेअरी संचालकांना वेळ...बुलडाणा : अमरावती विभागीय आयुक्तांच्या...
पीकविमा कंपनीसोबत प्रशासनाचे साटेलोटे...बुलडाणा : शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविम्यासाठी...
शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी...नाशिक : ‘‘मधुमक्षिका पालन उद्यान व प्रशिक्षण...
शेती प्रश्नांसाठी २४ ला समरजितसिह घाटगे...कोल्हापूर : शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल माफी,...
अमरावतीत आठवडाभर लॉकडाऊन जाहीर अमरावती : मुंबईनंतर कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून...
सांगली जिल्हा परिषदेत १०९ पदे रिक्त;...सांगली : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल...
अकोल्यात भाजीबाजार आता पहाटे 3 ते सकाळी...अकोला : कोरोना रोखण्यासाठी होत असलेल्या...
सोलापूर : शेतकऱ्यांनी भरले सहा कोटी...सोलापूर : महावितरणने शेतकऱ्यांसाठी कृषिपंपाच्या...
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची...सोलापूर : पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव...
जीएसटीच्या जाचक अटींच्या  निषेधार्थ...पुणे : वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या सातत्‍याने...
छोट्या बदलांद्वारेही देता येईल उत्तरबेटांचा देश असलेल्या इंडोनेशियाने २०१० पासून...
तंत्र भेंडी लागवडीचे...उन्हाळी भेंडीची पेरणी फेब्रुवारीच्या शेवटच्या...
नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात सुधारणा...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...