`कृषी`च्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा : आमदार डॉ. कुटे

`कृषी`च्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा : आमदार डॉ. कुटे
`कृषी`च्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवा : आमदार डॉ. कुटे

 बुलडाणा : कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचवाव्यात. शेतकरी हा कृषी विभागाचा केंद्रबिंदू असून त्यासाठी कृषी खात्याने पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा आमदार डाॅ. संजय कुटे यांनी व्यक्त केली. गटशेती काळाची गरज असून शेतकऱ्यांना ती करण्यास प्रोत्साहन व मार्गदर्शन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, आमदार हर्षपर्धन सपकाळ उपस्थि‍त होते. 

मागील खरीप हंगामामध्ये झालेल्या तालुकानिहाय पीक पेरणी, सरासरी पेरणी व प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये), रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र याचा आढावा या वेळी घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी सादरीकरण केले. सपकाळ यांनी खरीप हंगामासाठी पीकनिहाय निश्चित करण्यात आलेल्या पीककर्ज दराचा आढावा घेतला.

संकरित ज्वारीसाठी नऊ हजार ८००, संकरित बाजरी ८ हजार, मका बागायती /कोरडवाहू १२ हजार ४००, तूर १४ हजार ६८०, उडीद-मूग ७ हजार ६००, सूर्यफूल १० हजार ४८०, कापूस बागायती १७ हजार २००, कापूस जिरायती १७२००, सोयाबीन १७ हजार २०० रुपये असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.

गेल्या खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्जाचे १७५२ कोटींचे उद्दीष्ट होते. त्यापैकी ५९६ कोटी ७५ लाख रुपये पीककर्जाचे वितरण करण्यात आले. उद्दीष्टच्या ३४ टक्के पीककर्जाचे वितरण करण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com