सौरऊर्जा प्रकल्प योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ः जयंत पाटील

शेतीला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन लॅंड बॅंक पोर्टल तयार केले आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे मत पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
Reach out to farmers for solar energy project: Jayant Patil
Reach out to farmers for solar energy project: Jayant Patil

सांगली ः महाराष्ट्र कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिला पाहिजे. यासाठी ऊर्जा विभागाने नवीन कृषिपंप वीजजोडणी धोरण जाहीर केले आहे. शेतीला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन लॅंड बॅंक पोर्टल तयार केले आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे मत पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनी पोलिस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की वारणा प्रकल्प व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे बहुतांशी प्रश्‍न मार्गी लावले आहेत. उर्वरित प्रश्‍न सोडविण्यासाठी पुनर्वसन विशेष मोहिमेअंतर्गत वसाहतनिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांमध्ये प्राप्त अर्जावर तत्काळ निर्णय घेतला जात असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. ३१ पैकी ८ वसाहतीमध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्या आहेत.

पुनर्वसित वसाहतींसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची प्रक्रिया शासन स्तरावर प्रगतिपथावर आहे. चांदोली अभयारण्यातील ६१० खातेदारांसाठी निर्वाह भत्ता वाटपासाठी ४ कोटी ३६ लाख रुपयांहून अधिक निधी प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.जून ते ऑक्टोबर २०२० मधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमधील नुकसान यासाठी २६ कोटी १० लाख ६८ हजार रुपये रक्कम तालुक्यांना वितरित करण्यात आली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास ८१ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com