Agriculture news in Marathi Read complaints about crop insurance | Agrowon

नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला आहे. पीकविमा प्रस्ताव करणे, नुकसान झाल्यास ऑनलाइन तक्रार देणे, पाठपुराव्याची कार्यवाही होते. भरपाई मात्र मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

नाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा... क्षेत्रीय पातळीवर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची काही ठिकाणी वानवा... मिळत नसलेली पारदर्शक माहिती, यामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याची स्थिती आहे. अनेकांना जिल्हा कार्यालयांची माहितीच नाही. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता व लाभ मिळण्याचा अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला आहे. पीकविमा प्रस्ताव करणे, नुकसान झाल्यास ऑनलाइन तक्रार देणे, पाठपुराव्याची कार्यवाही होते. भरपाई मात्र मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

नुकसान झाल्यानंतर विमा घेतलेले शेतकरी कंपन्यांना संपर्क साधतात. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार कृषिमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यामुळे पीक विम्याबाबत भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला. याबाबत शेतकरी म्हणाले, की पीकविमा आहे, मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी तो नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यानंतर पीक विमा कंपन्यांच्या टोल फ्री नंबरवर फोन करतो. मात्र संपर्क होत नाही. झाला तर म्हणणे विचारात घेतले जात नाही. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. मात्र, नुकसान होऊन पीकविमा कंपनीला माहिती देऊन व पंचनामे होऊनही परतावा मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

पीकविम्याविषयी कृषी विभागाच्या क्षेत्रीय पातळीवर कर्मचाऱ्यांना विचारले असता वरिष्ठ कार्यालयाला विचारतो, सांगतो, अशी उत्तर दिले जातात. निफाड तालुक्यातील पूर्व भागात काही गावात कृषी सहायक नसल्याने माहितीच मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. पीकविम्याची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी सक्षम यंत्रणा उपलब्ध नाही. ‘पीक विमा शेतकऱ्यासाठी तोट्याचा; कंपनीसाठी नफ्याचा’ असल्याने शासन पीक विमा योजना कशासाठी काढायला लावते. शासनाने शेतकऱ्यांचा विचार करावा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नुकसान झाल्यानंतर ७२ तासांमध्ये तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी वेळेवर येत नाहीत. कृषी विभाग आवाहन करते. मात्र लाभच मिळत नसला, तर फायदा काय?

पीकविमा कार्यालय नावालाच 
कृषी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पीक विमा कार्यालय कार्यान्वित करण्यात आल्याचे समजते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींना टेबल देण्यात आला आहे. मात्र शेतकऱ्यांना याबाबत माहितीच नसल्याचे शेतकऱ्यांना विचारणा  केल्यानंतर समोर आले.

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पीक विमा घेण्यासाठी कमी प्रतिसाद आहे. विमा उतरलेला आहे, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा झाला पाहिजे. 
- किरण लभडे, शेतकरी, निमगाव मढ, ता. येवला.


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...