Agriculture news in Marathi Reading the purpose of National Day Constitution in Gram Panchayats: Minister Hasan Mushrif | Agrowon

ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी संविधान उद्देशिकेचे वाचन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे राष्ट्रीयदिनी सामूहिक वाचन होणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून राज्यात संविधानविषयक जनजागृतीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे राष्ट्रीयदिनी सामूहिक वाचन होणार आहे. येत्या २६ जानेवारीपासून राज्यात संविधानविषयक जनजागृतीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

श्री. मुश्रीफ म्हणाले, की प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन या दिवशी ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. या स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक हे संविधानातील उद्देशिकेचे वाचन करतील. नागरिकांमध्ये आपल्या भारतीय संविधानाविषयी जागृती व्हावी, आपल्या हक्क आणि कर्तव्यांविषयी त्यांना माहिती व्हावी. तसेच आपली लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. 

या संदर्भातील परिपत्रक सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात येत असून २६ जानेवारीपासून राज्यातील २७ हजार ८७४ ग्रामपंचायती, ३५१ पंचायत समित्या आणि ३४ जिल्हा परिषदांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.


इतर बातम्या
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...
पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार...पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती...
कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप...नगर  : ‘‘केंद्रीय अन्न व नागरी...
नगर जिल्ह्यात जनावरांचा उपचार चार...नगर ः नगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आता...
अकोला कृषी विदयापीठाने नियम डावलून...नागपूर : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
रेशन दुकानातून अंडी, चिकन देण्याला...पुणे ः मांसाहारातूनच विषाणूजन्य रोगांचा फैलाव होत...
अफार्मतर्फे ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी...पुणे  : अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्युअल इन...
सोलापूर जिल्हा दूध संघाची ‘नोटीस रद्द...सोलापूर  : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...
कृषी उद्योजकांच्या अनुभवांनी भारावले...बोंडले, जि. सोलापूर : उद्योजक होताना आलेल्या...
नगर : पैसेवारी कमी लावून प्रशासनाने...नगर ः यंदाही रब्बी हंगामात पीक परिस्थिती फारशी...
स्मार्ट ग्राम योजनेस आर. आर. पाटील...मुंबई   : ग्रामविकास विभागामार्फत...
रिक्त पदांमुळे सातारा ‘एकात्मिक...भिलार, जि. सातारा : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे...सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात...