Agriculture news in marathi Ready for onion nursery cultivation in Khandesh | Agrowon

खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे लागवडी योग्य होत आली आहेत. पुढील महिन्याच्या सुरवातीला अनेक शेतकरी लागवड करतील. यंदा रोपांचे दर किंचित कमी आहेत, अशी माहिती मिळाली. 

जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे लागवडी योग्य होत आली आहेत. पुढील महिन्याच्या सुरवातीला अनेक शेतकरी लागवड करतील. यंदा रोपांचे दर किंचित कमी आहेत, अशी माहिती मिळाली. 

कांदा बियाण्याचे दर अव्वाच्या सव्वा आहेत. त्यामुळे रोपवाटिकांमध्ये रोपांचे दरही फारसे कमी झालेले नाहीत. गेल्या वर्षी सदोष बियाणे, प्रतिकूल वातावरण यामुळे अनेक कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाले होते. हे नुकसान यंदा कमी आहे. अपवाद वगळता रोपवाटिका बऱ्यापैकी बहरल्या आहेत. गेल्या वर्षी अडीच फूट रुंद आणि १५० फूट लांब सरीतील कांदा रोपे आठ ते १० हजार रुपयात शेतकऱ्यांना उपलब्ध होत होती. यंदा मात्र दर तेजीत नाहीत. 

धुळ्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, धरणगाव, एरंडोल भागात अनेक शेतकरी व्यावसायिक रोपवाटिका तयार करतात. यंदा सुमारे एक हजार हेक्टरवर रोपवाटिका आहेत. धुळे, नंदुरबारात रोपवाटिका वाढल्या आहेत. यामुळे कांदा रोपांचे दर फारसे कमी नाहीत. यंदा अडीच फूट बाय १५० फूट लांब सरीमधील कांदा रोपे साडेसहा ते सात हजार रुपयांत मिळतात. रोपवाटिका जोमात असल्या तरीदेखील रोपांचे दर फारसे कमी नाहीत. कांदा बियाणे यंदा अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांना देण्यात आले. रोपांचे दरही फारसे कमी नसल्याची स्थिती आहे.

रोपांची चांगली वाढ

मध्यंतरी अतिउष्णतेत काही रोपांचे नुकसान झाले. यावर शेतकऱ्यांनी विद्राव्य खते, बुरशीनाशके व पाण्याची योग्य मात्रा याचे नियोजन करून रोपवाटिका वाढविल्या. सध्या तापमान कमी झाले आहे. गारवा असल्याने रोपांची चांगली वाढ होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


इतर ताज्या घडामोडी
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...
अकोला : पावसामुळे सोयाबीन, कापूस...अकोला : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर या भागात...
नागपुरात पीक नुकसानीचे  पंचनामे सुरू...नागपूर : गेल्या काही दिवसांत नागपूर जिल्ह्यात...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...