Agriculture news in marathi Reasons for the rise in mustard Different: Vijay Jawandhiya | Agrowon

मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय जावंधिया

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 जून 2021

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात डॉलर स्वरूपात आलेली वृद्धी आणि रुपयाचे अवमूल्यन ही दोन कारणे लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर मिळत असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये केला होता. मात्र त्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात डॉलर स्वरूपात आलेली वृद्धी आणि रुपयाचे अवमूल्यन ही दोन कारणे लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत शेती प्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये मोहरीला हमीभाव ४६५० च्या तुलनेत ७००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यामागील कारणांचा खुलासा त्यांनी केला नाही. गेल्या वर्षी बाजारात मोहरी तेलाचे भाव ११० ते १२० रुपये प्रति किलो होते. या वर्षी तेच दर १७० ते दोनशे वीस रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आपण खाद्य तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ शकलो नाही.

भारतात देखील पावसामुळे सोयाबीन उत्पादक प्रभावित झाली होती. त्याचवेळी जागतिक बाजारातून खाद्यतेल तसेच सोयाबीन खरेदीत चीनकडून वाढ करण्यात आली. या सर्वांचा परिणामी जागतिक बाजारात दरात वाढ होणे स्वाभाविक होते. अमेरिकन बाजारात गेल्यावर्षी सोयाबीनचे दर सात ते आठ डॉलर प्रति बुशेल होते. या वर्षी त्यात दुपटीने वाढ होत ते दर १४ ते १५ डॉलर प्रति बुशेल (एक बुशेल म्हणजे २७ किलो) झाले आहेत.

सोयाबीन तेलाचे दर मार्च २०२० मध्ये ६१४ डॉलर प्रति टन होते. ते आज १२७९ डॉलर प्रति टन झाले आहेत. सूर्यफूल तेलाचे दर वर्षभर आधी ६५६ डॉलर प्रति टन होते. ते आज १५८० डॉलर प्रति टन झाले आहेत. त्यासोबतच पाम तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. आपण सत्तेत आला त्या वेळी एका डॉलरचा विनिमय दर ६० रुपये होता. आज तो ७३ रुपयांवर पोहोचला आहे. असेही जावंधिया यांनी पत्रातून दाखवून दिले आहे.


इतर अॅग्रोमनी
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...
दुसऱ्या लाटेचा बासमती तांदळास फटका कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बासमती...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
इंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर...कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांत देशातून निर्यात...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
साखर निर्यातीचा ‘गोडवा’ वाढलाकोल्हापूर : केंद्राकडून साखर निर्यात धोरण जाहीर...
पाम तेल आयातीवर श्रीलंकेचा ‘सर्जिकल...कोलंबो : श्रीलंका सरकारने पाम तेलाच्या आयातीवर...
सोयाबीनची तेजी अबाधित पुणे ः यंदा सोयाबीच्या दरांमध्ये झालेली सुधारणा...
भारताकडून पिवळ्या वाटाण्याची आयात बंद पुणे ः युक्रेनमधून पिवळ्या वाटाण्याची आयात करणारा...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः यंदाचा बेदाणानिर्मितीचा हंगाम अंतिम...
हरभरा दरवाढीचे संकेतपुणे ः देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक...