पुणे जिल्ह्यात पावसाने भात पिकांना दिलासा

पुणे जिल्ह्यात पावसाने भात पिकांना दिलासा
पुणे जिल्ह्यात पावसाने भात पिकांना दिलासा

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भात पट्ट्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या भात पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस पावसाचा असाच जोर कायम राहिल्यास भात पीक हाताशी येऊन चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा भात उत्पादक शेतकऱ्यांना आहे. 

जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे अधूनमधून उन्हाचा पाराही काही प्रमाणात वाढला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी पावसासाठी पोषक वातावरण झाल्याने पुन्हा तुरळक ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

वडीवळे, आंध्रा, भामा आसखेड, कळमोडी, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे ओढे, नाल्यांतील पाण्याच्या प्रवाहात वाढ होऊन पुन्हा ते खळाळून वाहू लागले आहेत.   पश्‍चिम भागातील उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे उशिराने भात लागवडी झाल्या. या भागातील भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांच्या पश्‍चिम भागात भाताचे सरासरी ७२ हजार ९५३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५७ हजार ८१७ हेक्टर म्हणजेच जवळपास ७९ टक्के भाताची पुनर्लागवड झाली. तर १५ हजार १३६ हेक्टर क्षेत्र अजूनही भात लागवडीपासून दूर आहे. 

यंदा अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकण्याऐवजी मावळ व मुळशी भागातील काही शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने थेट भात लागवडी केल्या. त्यामुळे रोपवाटिकेच्या क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली. आत्मा योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या शेतकऱ्यांनी भात लागवडीची यांत्रिकीकरणाद्वारे ३१० एकरांवर लागवड  केली. 

तालुकानिहाय भात लागवड (हेक्टरमध्ये)  

तालुका भात लागवड
हवेली १९९६
मुळशी ७६५७
भोर ७५१०
मावळ   १२,४६२ 
वेल्हे ५१८४
जुन्रर १०,३७० 
खेड ७२३३
आंबेगाव ५२३४
पुरंदर  १७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com