Agriculture news in Marathi, Rebuilt system at Marathwadi dam | Agrowon

मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्ज

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

ढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले मराठवाडी धरणाचे बांधकाम आता पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. धरणस्थळी बांधकाम यंत्रणाही सज्ज झाली असून, धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नातून मार्ग काढून आगामी सात महिन्यांत धरणाच्या बांधकामाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सध्या पाटबंधारे विभागासमोर आहे. 

ढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले मराठवाडी धरणाचे बांधकाम आता पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. धरणस्थळी बांधकाम यंत्रणाही सज्ज झाली असून, धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नातून मार्ग काढून आगामी सात महिन्यांत धरणाच्या बांधकामाचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सध्या पाटबंधारे विभागासमोर आहे. 

वांग नदीवरील मराठवाडीजवळ सुमारे २२ वर्षांपूर्वी २.७३ टीएमसी पाणीसाठा क्षमतेच्या धरणाच्या बांधकामाला सुरवात झालेली असली तरी अद्याप ते पूर्ण झालेले नाही. सध्या धरणाच्या बांधकामाने मोठी गती घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांचाही निपटारा करण्याचे काम वेगाने सुरू आहे. 

धरणाच्या सांडव्याच्या बांधकामाचा एक टप्पा पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्याने त्यातील पाणीसाठवण क्षमता ०.६० टीएमसी वरून १.०५ टीएमसीवर पोचली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पाणीपातळी ६४३ मीटरवर पोचल्याने अनेक धरणग्रस्त कुटुंबांना निवारा शेडमध्ये पाठवावे लागले. सध्याही त्यांचा तेथेच मुक्काम आहे. पावसाळ्यात थांबविलेले धरणाचे बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी सध्या हालचाली सुरू झाल्या असून, रोलर, पोकलेन, डंपर, मिलर, डोझर यांसह कर्मचारी यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे. 

धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्‍चित केल्याने काँक्रिटीकरण, पिचिंग, मातीकाम, गेट, इंटकवेल यांची शिल्लक राहिलेली कामे पूर्णत्वाला नेण्याचे मोठे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे. या धरणातील काही धरणग्रस्तांचे प्रश्न अजूनही प्रलंबितच आहेत. त्यामध्ये माहुली गावठाणात पुनर्वसित होणाऱ्या उमरकांचन येथील धरणग्रस्तांचा चिघळलेला प्रश्न, मोठा गाजावाजा करून मंजुरी दिलेल्या मेंढ गावठाणातील नागरी सुविधा व भूखंडांचा प्रश्न, थकीत निर्वाह भत्ता आदींचा समावेश आहे.

कऱ्हाड-पाटणला दिलासा द्यावा
मराठवाडी धरणाचे लाभक्षेत्र कऱ्हाड व पाटण तालुक्‍यात असून, टेंभू योजनेलाही यातील पाण्याचा फायदा होणार आहे. लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित केल्या असून, २२ वर्षांपासून लाभक्षेत्रातील शेतकरी मराठवाडीच्या पाण्याकडे डोळे लावून बसले आहेत. वांग नदीवर कोल्हापूर पद्धतीचे दहा बंधारे बांधून पाणी अडविण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी आठ बंधारे पूर्ण झाले आहेत. यावर्षी तरी हा प्रकल्प पूर्णत्वाला नेऊन दिलासा द्यावा, अशी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.


इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी  ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...
पिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे  : पिंपळनेर (ता.साक्री)...
शासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव  : शासकीय मका खरेदिला...
बार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर  ः दीड वर्षांपूर्वी भीषण...
पावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
आणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...
नगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...