Agriculture news in marathi, received less rainfall in 69 circles in June and July in Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये ६९ मंडळांत कमी पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९ मंडळांमध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात जूनपाठोपाठ जुलै महिन्यात कमी पाऊस झाला. 

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९ मंडळांमध्ये जून, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात जूनपाठोपाठ जुलै महिन्यात कमी पाऊस झाला. तर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मात्र जास्त पाऊस झाला.

यंदाच्या १२ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार पावसाच्या सरासरीत सुधारणा करण्यात आली. महावेध प्रकल्पांतर्गंत प्रत्येक महसूल मंडळातील पर्जन्यमानाची आकडेवारी कृषी विभागाच्या महारेन संकेतस्थळावर देण्यात येते. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी २४४.३० मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात २०९.२ (८५.६३ टक्के) पाऊस झाला. तर जून, जुलै महिन्यात ३९९.७ मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात ३५० मिमी (८७.६ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यतील ५७ मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात जुलै महिन्यात २१९.२० मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, तो २२९ मिमी (१०४.६ टक्के) झाला. जून, जुलै महिन्यात सरासरी ३६४.५ मिमी पाऊस आहे. परंतु, प्रत्यक्षात ४२६.१ मिमी (११६.९ टक्के) पाऊस झाला. जिल्ह्यातील ३१ मंडळांत सरासरी पेक्षा जास्त, तर ८ मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

हिंगोली जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी २३०.२० मिमी पाऊस अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्षात २७६ मिमी (१२०.१ टक्के) पाऊस झाला. जून, जुलै महिन्यात ३९९.४ मिमी पाऊस अपेक्षित आहे. पंरतु, प्रत्यक्षात ५१२ मिमी (१२८.२) टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील २६ मंडळात सरासरीपेक्षा जास्त, तर ४ मंडळांत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस स्थिती ( कंसांत टक्केवारी)

नांदेड जिल्हा ः नांदेड शहर (८९.९), नांदेड ग्रामीण (९८.१), वजीराबाद (९१.३), तुप्पा (८५.), वसरणी (८६.९),तरोडा (९८.२), अर्धापूर (८६), दाभड (८८.७), मुदखेड (७९.८), मुगट (८६.६), हदगाव (८२.९), तळणी (८३), निवघा (७१.५), तामसा (७१.६), पिंपरखेड (८८.६), आष्टी (६३.८), माहूर (७१.९), वानोळा (५९.९), वाई (७४.९), सिंदखेड (५३.९), किनवट (८६.७), बोधडी (७३.३), इस्लापूर (६९.७), जलधारा (६९.७), शिवणी (७३.४), मांडवी (६३.३), दहेली (६०.२), हिमायतनगर (८४.३), जवळगाव (९९.५), सरसम (७८.९), भोकर (९४.३), मातुल (८२.५), किनी  (८०.२),उमरी (८५.९), गोळेगाव (६५.७), करखेली (७०.४), जारिकोट (७६.४), बिलोली (८६.९), सगरोळी (९७), कुंडलवाडी (६६.९), आदमपूर (५३.४), लोहगाव (८७.७), खानापूर (९७.३), मालेगाव (६६.६), शहापूर (९५.२), हनेगाव (८९.८), मुखेड (८४.७), जाहूर (८९.५), चांडोळा (६८.९), कंधार (८७.१), 
कुरुला (८९.६), फुलवळ (९४.८), पेठवडज (८१.८), बारुळ (८८.४), लोहा (९६.३), सोनखेड (९२), शेवडी (९०.३).

परभणी जिल्हा ः परभणी ग्रामीण (८४.१ ), पेडगाव (८९.५ ), झरी (८३.६ ),दैठणा (८१.२),सावंगी म्हाळसा (९३.७), बामणी (९८.९), महातपुरी (९५.७),माखणी (९५.५),

हिंगोली जिल्हा ः आंबा (८४.६ ), गिरगाव (७७.३), साखरा (८६.३ ), हत्ता (८३.४).


इतर बातम्या
वनौषधी लागवडीसाठी निधी असूनही अनास्था पुणे: आयुर्वेदात प्रगत असल्याची जगभर शेखी...
पावसाचा जोर ओसरणार पुणे ः गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,...
मोडून पडली काढणीला आलेली केळी औरंगाबाद: काही दिवसांत जवळपास दोन वर्ष...
निर्यातबंदीनंतरही कांदा खाणार भाव पुणे: निसर्ग चक्रीवादळात कांदा रोपवाटिकांचे...
पावसाचे धुमशान सुरुच पुणे   ः राज्यातील काही भागांत...
जळगाव जिल्ह्यात केळीचे १०० कोटींवर...जळगावः केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
यांत्रिकीकरण योजना सुरु, पोर्टल मात्र...नगर ः शेती अवजारांसह अन्य वैयक्तिक लाभाच्या...
निम्मे कांदा कंटेनर अद्यापही बंदरावरच नाशिक: कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाअगोदर मुंबई...
कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी...बुलडाणा : कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...