Agriculture news in marathi Received Rs. 56 crores of fodder campers in Sangola taluka | Agrowon

सांगोला तालुक्यातील छावणीचालकांचे ५६ कोटी रुपये प्राप्त

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

सोलापूर : ‘‘सांगोला तालुक्‍यात १४६ चारा छावण्यांवर तब्बल १३२ कोटी ५९ लाख ७७ हजार रुपये खर्च झाले आहेत. यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेले ३८ कोटी ७५ लाख रुपये छावणीचालकांच्या खात्यांत जमा केले आहेत. त्यांचे थकीत अनुदान देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून तालुक्‍यासाठी ५६ कोटी नऊ लाख ९० हजार रुपये प्राप्त झाले. ते छावणीचालकांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे,’’ अशी माहिती तहसीलदार योगेश खरमाटे यांनी दिली. 

सोलापूर : ‘‘सांगोला तालुक्‍यात १४६ चारा छावण्यांवर तब्बल १३२ कोटी ५९ लाख ७७ हजार रुपये खर्च झाले आहेत. यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेले ३८ कोटी ७५ लाख रुपये छावणीचालकांच्या खात्यांत जमा केले आहेत. त्यांचे थकीत अनुदान देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून तालुक्‍यासाठी ५६ कोटी नऊ लाख ९० हजार रुपये प्राप्त झाले. ते छावणीचालकांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे,’’ अशी माहिती तहसीलदार योगेश खरमाटे यांनी दिली. 

दुष्काळात तालुक्‍यात १४६ छावण्यांमध्ये सुमारे एक लाख ३१ हजार लहान-मोठी जनावरे दाखल होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने छावण्यांत जनावरांच्या चारापाण्याची सोय केली. त्यामुळे बाजारात कवडीमोल विक्री होणारे लाखमोलाचे पशुधन जगविण्यासाठी पशुपालकांना मदत झाली. परतीच्या पावसाने चारा उपलब्ध झाल्याने १३ ऑक्‍टोबर रोजी तालुक्‍यातील सर्व छावण्या बंद करण्यात आल्या.

तालुक्‍यातील १४६ चारा छावण्यांवर तब्बल १३२ कोटी ५९ लाख ७२ हजार रुपये खर्च झाले. चारा छावण्यांना अनुदान देण्यासाठी महसूल प्रशासनाकडे यापूर्वी प्राप्त झालेली ३८ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम छावणीचालकांच्या बॅंक खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित बिले मिळण्यासाठी छावणीचालकांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. मंगळवारी (ता. २६) चारा छावण्यांची थकीत बिले देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी सांगोला तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे.

केंद्र सरकारकडून जुलै महिन्यासाठी  २० कोटी ९७ लाख १४ हजार २९५ रुपये व ऑगस्ट महिन्यासाठी १८ कोटी २९ लाख ७८ हजार ७०५ रुपये, असे एकूण ३९ कोटी २६ लाख ९३ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. 

राज्य सरकारकडून जुलै महिन्यासाठी आठ कोटी ९८ लाख ७७ हजार ५५५ रुपये व ऑगस्ट महिन्यासाठी सात कोटी ८४ लाख १९ हजार ४४५ रुपये असे एकूण १६ कोटी ८२ लाख ९७ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...