नाशिकमध्ये ‘कोरोना’ तपासणी प्रयोगशाळेला मान्यता 

नाशिक : जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय संशोधन संस्थेत ‘कोरोना’ तपासणी प्रयोगशाळेला केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली असून, त्यामुळे ‘कोरोना’ विरोधी लढा देण्यासाठी बळ मिळणार आहे. यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासन, समस्त नाशिककरांनी गेल्या आठ दिवसांत घेतलेल्या चिवट प्रयत्नांची फलश्रृती जिल्ह्यासाठी असल्याची भावना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केली आहे.
Recognition of 'Corona' testing laboratory in Nashik

श्री. मांढरे म्हणाले की, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या नागपूर कार्यालयाने सोमवारी (ता. २०) जिल्ह्यातील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय तथा मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये ‘कोरोना’ तपासणी प्रयोगशाळेला सर्व निकषांवर पूरिपूर्ण ठरल्याबद्दल मान्यता दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील संभाव्य ‘कोरोना’बाधितांची संख्या पाहता पुणे व धुळे येथे प्रलंबित राहणारी रिपोर्ट संख्या पाहता नाशिकमध्ये स्वतंत्र ‘कोरोना’ तपासणी लॅब असावी, अशी मागणी वाढू लागली होती. 

पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व सर्व लोकप्रतिनिधींनी त्यासाठी आग्रही पुढाकार घेतला होता. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्यावर ही लॅब स्थापित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी व त्यांच्या टीमने ही जबाबदारी अत्यंत सचोटीने पार पाडत अवघ्या आठ दिवसांत ही प्रयोगशाळा सर्व निकषांवर परिपूर्णपणे सुरू करण्यात यश मिळवले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सांगितले. 

आठ दिवसांपूर्वी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात ‘कोरोना’ टेस्टींग लॅब सुरू करता येऊ शकते, असे संकेत दिले होते. त्यानुसार महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, दातार लॅबचे डॉ. दादासाहेब अकोलकर, अपोलो हॉस्पिटलचे व्यवस्थापन यांच्यात समन्वय घडवून आणला. दातार व लॅब व अपोलो हॉस्पिटल यांनी या लॅबसाठी लागणारे त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सर्व इक्विपमेंट देण्याची तयारी दर्शवली. मायक्रोबाॅयलाॅजिस्ट डॉ. निता गांगुर्डे व त्यांच्या दोन तंत्रज्ञ यांना नागपूर येथे प्रशिक्षणासाठी गेल्या आठवड्यात पाठवण्यात आले. त्यांच्या प्रशिक्षणानंतर शनिवारी, रविवारी त्यांच्याकडून ब्लॅक सॅम्पल्सची चाचणी घेतली. ती चाचणी दोन वेगवेगळ्या स्तरावर बरोबर निघाल्यानंतरच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com