धुळे जिल्ह्यात पंधरा पाणी वापर संस्थांना मान्यता

शासनाच्या ध्येय धोरणानुसार पाण्याचा काटकसरीने, नियोजन पद्धतीने वापर करून बचत व्हावी. यासाठी या पंधरा पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यांची कार्यवाही, कामकाज प्रगतिपथाकडे आहे. संस्थेच्या कार्यास बळकटी प्राप्त होऊन पाण्याचे समन्यायी वाटप होऊ शकणार आहे. - ए. एस. पाटील, कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग, धुळे.
धुळे जिल्ह्यात पंधरा पाणी वापर संस्थांना मान्यता
धुळे जिल्ह्यात पंधरा पाणी वापर संस्थांना मान्यता

देऊर, जि. धुळे : निम्न पांझरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचा सिंचन व्यवस्थापनात सहभागी करून स्थापन केलेल्या पंधरा सहकारी पाणी वापर संस्थांना नुकतीच जलसंपदा विभागातर्फे मान्यता देण्यात आली.

या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात पहिल्यांदाच या पाणी वापर संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सिंचन पद्धत शेतकऱ्यांकडून कायदा २००५ अन्वये धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी  अभियंता आर. एस.  बडगुजर यांनी पंधरापैकी १३ संस्थांना नुकतेच प्रमाणपत्र दिले.

केवळ ग्रामपंचायतीच्या पत्रामुळे उर्वरित दोन संस्थांच्या प्रमाणपत्राची औपचारिकता बाकी आहे. या पार्श्वभूमीवर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खंडलाय खुर्द, भदाणे, नूरनगर, महालकाळी, महालमळी, शिरधाने, कावठी, अकलाड, कुसुंबा, नवलाणे, मेहेरगाव, सुट्रेपाडा, उडाणे, गोताणे, सांजोरी, कुंडाणे गावांतील या संस्थांना कृषी विकासाचे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

 ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप` संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पाणी नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी लाभार्थींचा सहभाग घेऊन सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे.

मान्यताप्राप्त पाणी वापर संस्था ... गाव क्षेत्र

  • भटाई देवी पाणी वापर संस्था    खंडलाय खुर्द
  • किसान पाणी वापर संस्था    भदाणे, नूरनगर, महालकाळी,                                             
  • श्री स्वामी समर्थ पाणी वापर संस्था    शिरधाने
  • महाजनेश्वर पाणी वापर संस्था    शिरधाने, कावठी, अकलाड
  • बळिराजा पाणी वापर संस्था कावठी, कुसुंबा
  • जय किसान पाणी वापर संस्था    कावठी, कुसुंबा
  • आई भवानी पाणी वापर संस्था    कावठी
  • अहल्याबाई होळकर पाणी वापर संस्था    नवलाणे, मेहेरगाव
  • जय बजरंग पाणी वापर संस्था    नवलाणे, मेहेरगाव, सुट्रेपाडा
  • जय भवानी पाणी वापर संस्था    मेहेरगाव
  • राजमाता अहल्याबाई पाणी वापर संस्था उडाणे, गोताणे
  • श्री मोरेश्वर पाणी वापर संस्था    सांजोरी
  • इच्छापूर्ती पाणी वापर संस्था    कुंडाणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com