agriculture news in Marathi recognize Danger of temperature hick in time Maharashtra | Agrowon

तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल: प्रदीप पुरंदरे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी हस्तक्षेपामुळे वाढ होते आहे. त्यामुळे निर्माण झालेला वाढत्या तापमानाचा धोका वेळीच ओळखावा लागेल. तापमान वाढू नये यासाठी प्रयत्न हवे, असे मत जलअभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्‍त केले. औरंगाबाद येथे गुरुवारी (ता. २१) आयोजीत पीक पाणी परिषदेत ‘हवामान बदल व वाळवंटीकरणाचा धोका’ याविषयावर ते बोलत होते. 

औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी हस्तक्षेपामुळे वाढ होते आहे. त्यामुळे निर्माण झालेला वाढत्या तापमानाचा धोका वेळीच ओळखावा लागेल. तापमान वाढू नये यासाठी प्रयत्न हवे, असे मत जलअभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी व्यक्‍त केले. औरंगाबाद येथे गुरुवारी (ता. २१) आयोजीत पीक पाणी परिषदेत ‘हवामान बदल व वाळवंटीकरणाचा धोका’ याविषयावर ते बोलत होते. 

टेरी आणि इस्त्रोच्या अहवालांचा दाखला देवून श्री. पुरंदरे म्हणाले, हवामान बदल आणि वाळवंटीकरणाचं संकट उभं ठाकलं आहे. हवामान बदल व वाळवंटीकरणाच्या संकटामुळे येत्या काळात पाऊसमान वाढेल मात्र कमी वेळात जास्त पाऊस, कमी पावसाच्या दिवसात वाढ, पावसाच्या खंडात वाढ, दुष्काळ व पुराचे चक्र वाढण्याचे धोके आहेत. परिस्थितीचा अभ्यास करता बदलत्या हवामानाचा व महाराष्ट्रात सर्वाधिक धोका नंदूरबार जिल्ह्याला तर सर्वात कमी धोका सातारा जिल्ह्याला दिसतो हे  गांभीर्याने घ्यायला हवं. 

‘‘वाळवंटीकरणा चे क्षेत्र वाढणाऱ्या राज्यात राजस्थाननंतर महाराष्‌ट्राचा क्रमांक लागतो. उत्पादकता व जैवविविधता गमावल्याने, हरित आच्छादन कमी झाल्याने व पाणी, वाऱ्यामुळे धुप झाल्याने वाळवंटीकरण वाढते आहे. २०११ ते २०१३ च्या अहवालानुसार राज्यात वाळवंटीकरणाकडे वळलेल्या क्षेत्राचे प्रमाण ४५ टक्‍क्‍यांवर गेलंय हा सर्वात मोठा धोका आहे. सरासरी २६.४६ डीग्री असणार तापमान २०३० साली दीड डिग्रीने , २०५० साली अडीच डिग्रीने तर २०७० साली साडेतीन डिग्रीने वाढण्याची शक्‍यता आहे. या संकटाचा सामना करताना परिणामकारक जलव्यवस्थापन व त्याला वॉटरेशडची जोड द्यावी लागेल,’’ असे ते म्हणाले. 

''पाण्याची न्यायालयीन लढाई जिंकली पुढे काय'' याविषयावर ॲड. प्रदीप देशमुख म्हणाले, की न्यायिक लढाई जिंकलो आता राजकीय लढाई लढावी लागणार आहे. यासाठी लवकरात लवकर रेखांकनाचे काम झाले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य जलपरिषदेची उपसमिती नेमावी. या समितीने न्यायालयाच्या निर्देशाचा अभ्यास करून मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांनी वेळेत निर्णय घ्यावा. दमणगंगा, तापी नदीचे पाणी गुजरातला नेण्याचा प्रयत्न होत आहे. तो हाणून पाडावा. 

‘‘केवळ लागवडीपासून पिकाच्या खळ्यापर्यंत येऊन शेती थांबू नये तशी पीक व प्रक्रियेचे पद्धती असणारी शेती करावी लागेल.’’ असे मत कृषी पीक पद्धतीचे अभ्यासक उदय देवळाणकर यांनी अनुकूल पीक पद्धती व उपाययोजना'' याविषयी बोलताना मांडले. श्री. देवळानकर म्हणाले,  आपल्या भागाची पीक उत्पादनाची क्षमता लक्षात घेऊन पीक नियोजन केल्यास तेलबिया व डाळवर्गीय पिकांमध्ये मराठवाड्यात क्रांती करता येवू शकते. प्रोऍक्‍टीव्ह रिसर्चचा अंतर्भाव शेतीमध्ये करावा लागेल. पिकाचं नियोजन करताना रोजगाराचा विचार करून ते केल्यास खळ्यात शेती थांबणार नाही. 

‘कसा वाढेल विभागाचा जलसंचय’ याविषयी बोलताना मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकरराव नागरे यांनी मराठवाड्यात उपलब्ध पाणी किती, हक्‍काचे किती, कमी पडते किती, आणायचे कुठून, मराठवाडा वॉटर ग्रीड काय, कृष्णेचा पाणी प्रश्न, अनुशेष वाल्मीक, शहरातील पाणी, उसाचे पाणी, रेखांकन पाण्याचे बाष्पीभवन आदी मुद्यांना हात घातला.

श्री विजयअण्णा बोराडे म्हणाले, ‘‘आपले चित्त मोठ्या धरणात अडकले आहे. हक्‍काचं पाणी मिळालच पाहिजे परंतु तोवर आपल्या हातात असलेलं पाणलोट क्षेत्र वाढवून आपण पावसाचे पाणी अडवू, साठवू शकतो. जे प्रत्यक्ष खाता येत नाही परंतु उत्पन्न देतील असा पिकांत बदल करून गवत,  बांबू, डाळ, तेलबिया आदी पिकांची लागवड करता येईल. 

परिषदेतील सर्व विषयांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असल्याचे या पीक पाणी परिषदेचे  संयोजक माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले. समारोपीय सत्राला महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रामुख्यांनी उपस्थिती होती. 

श्री. पुरंदरेंनी असे सुचविले उपाय

 • कृषी विस्तार सेवा बळकट करणे
 • कृषी हवामानाविषयी अचूक व स्पेसीफीक माहिती देणे
 • बियाण्यांवर संशोधन, सुपीक जमिनीचे अकृषीकरण थांबविणे
 • पाऊस बाष्पीभवनाचे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन जलव्यवहार करणे
 • भूजल पुनर्भरणाला प्रोत्साहन देणे
 • भूजल कायदा २००९ चे नियम तयार करणे व अंमलबजावणी करणे
 • मृदसंधारणावर भर देणे, नदी पुनरुज्जीवनावर भर देणे
 • राज्यस्तरीय सिंचन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती व समन्यायी पाणी वाटप
 • कालवा सल्लागार समित्या बरखास्त करणे
 • एकात्मिक जलआराखड्याची अंमलबजावणी, वाल्मी जलसंपदा विभागाकडे देणे. शास्त्रीयदृष‌ट्या जलव्यवस्थापन करणे
   

इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...