agriculture news in marathi, Reconstruction of drought situation in Yeola, Niphad | Agrowon

येवला, निफाडच्या दुष्काळी परिस्थितीची फेरपाहणी करणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

नाशिक : येवला आणि निफाड तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची फेरपाहणी करण्यासाठी राज्य सरकारतर्फे पथक पाठवण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे.

नाशिक : येवला आणि निफाड तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची फेरपाहणी करण्यासाठी राज्य सरकारतर्फे पथक पाठवण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाडसह इतर तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ असूनही या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला नाही. याबाबत भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक व सिन्नर या आठ तालुक्यांमध्ये पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या प्रयोगामध्ये मदारसंघातील येवला व निफाड तालुक्यांचा समावेश नाही. या तालुक्यात प्रचंड दुष्काळ असतानाही पावसाच्या आकडेवारीसाठी तालुक्याची सरासरी काढल्यामुळे हा प्रकार झाला आहे. तालुक्याची सरासरी न धरता मंडलनिहाय पाऊस व इतर इंडिकेटर्सचा विचार करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या महसूल यंत्रणेने पाठविलेल्या अहवालांचासुद्धा पीक कापणी प्रयोगासाठी विचार झाला नाही.

नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग या संस्थेकडून मिळालेल्या पीक पाण्याच्या स्थितीनुसार दुष्काळ सदृश तालुके जाहीर करण्यात येणार आहेत. कोल्हापूरमधील राधानगरी व गगनबावडा इ. तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊनही या तालुक्यांचा दुष्काळसदृश यादीत समावेश होतो. मात्र तीव्र दुष्काळ आणि पाणीटंचाई असूनही येवला तालुक्याला वगळले जाते, हे अत्यंत संतापजनक असल्याचे भुजबळ यांनी म्हटले होते.येवला व निफाड तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे. त्यामुळे येथील सद्यपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य शासनाने पथक पाठवून या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी भुजबळ यांची मागणी आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही तालुक्यांमध्ये पथक पाठवून फेरपाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...