पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५ ट्रक आवक

record break onion truck 325 Incoming in Pune market committee
record break onion truck 325 Incoming in Pune market committee

पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी (ता. २४) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा कोणताही परिणाम पुणे बाजार समितीमधील शेतमालाच्या आवकेवर झाला नाही. बाजार समितीमध्ये भाजीपाल्याच्या राज्य आणि परराज्यांतून सुमारे १५० ट्रक आवक झाली, तर कांद्याची विक्रमी सुमारे ३२५ ट्रक आवक झाली होती, अशी माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. 

राज्याच्या विविध भागात बंदचा परिणाम झाला असला तरी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाल्याची आवक सुरळीत होती. कांदा विभागात विक्रमी ३२५ ट्रक आवक झाली होती. यावेळी दर दहा किलोला २५० ते ३२० रुपयांपर्यंत होते. सोलापूर बाजार समिती बंद असल्याने कांद्याची आवक वाढल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

तसेच शनिवारी (ता.२५) साप्ताहिक बंद आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीमुळे सलग दोन दिवस बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांनी आज भाजीपाला आणला असल्याचे देखील भुजबळ यांनी सांगितले. तर मोठ्या प्रमाणावरील कांद्याच्या आवकेमुळे दर कमी झाले असून, इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com