सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी

सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी

सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक पाऊस यंदा झाला. ऑक्टोबरअखेरपर्यंत ८ हजार ९८७ मिलिमीटर अर्थात १७६ टक्के  इतक्या पावसाची नोंद झाली. या पावसाने जिल्ह्यातील आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. 

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांत वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, या भागात सातत्याने पाऊस पडला. यामुळे या भागातील शेती हिरवीगार होती. परंतू दुष्काळी पट्ट्यात पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळ होता. पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी इथला शेतकरी वणवण फिरत होता. पाऊस नसल्याने शिवार मोकळे पडले होते. परिणामी शेतातून काही हाती लागत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. परंतु दुष्काळीपट्ट्यातील शेती आणि जगण्याची आस शेतकऱ्यांनी सोडली नव्हती.

यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पावसाने दडी मारली. त्यानंतर मृग, हस्त ही नक्षत्रे कोरडी गेली. परिणामी यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली. जून महिना कोरडा गेला. आता पाऊस पडणार का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला होता. विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यात महापूर आला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. परंतु परतीचा पाऊस सुरू झाला, हा पाऊस संपूर्ण जिल्हाभर पडला. यामुळे दुष्काळी भागातील पाणीटंचाई कमी होऊ लागली. परंतू मॉन्सूनोत्तर पावसाने देखील सुरवात केली. त्यामुळे पावसाच्या आजपर्यंत केलेल्या नोंदी मागे पडल्या. 

जिल्ह्यात ४५२ मिलिमीटर म्हणजे ४८ टक्के इतका पाऊस २००३ मध्ये झाला होता. त्या वेळी मोठा दुष्काळ पडला होता.  त्यानंतर गेल्या वर्षी जिल्‍ह्यात ८० टक्के म्हणजे ४ हजार १३२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. या वर्षी सुद्धा दुष्काळाशी सामना करावा लागला होता. 

भूजल पातळीत वाढ 

कवठेमहांकाळ, तासगाव, जत, खानापूर, आटपाडी, मिरज पूर्वभाग या तालुक्यांतील भूजल पातळीत मोठी घट झाली होती. त्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. शिवारे मोकळी होती. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. मात्र या वर्षीच्या पावसाने भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी कूपनलिका ओव्हरफ्लो झाल्या आहेत. यंदा दुष्काळीपट्ट्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार नाही. 

गेल्या पाच वर्षांतील पाऊस 

वर्ष पाऊस (मि.मी) टक्केवारी
२०१४ ५६६३.७ ११६.८
२०१५ ३५७५.६  ७०.१
२०१६ ६०५७.४ ११९
२०१७ ५४९६.४ १०७.६
२०१८ ४१२४ ८०
२०१९ ८७८७ १७६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com