Agriculture news in marathi, 'Record break' performance of rains this year in Sangli district | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड ब्रेक’ कामगिरी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक पाऊस यंदा झाला. ऑक्टोबरअखेरपर्यंत ८ हजार ९८७ मिलिमीटर अर्थात १७६ टक्के  इतक्या पावसाची नोंद झाली. या पावसाने जिल्ह्यातील आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. 

सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक पाऊस यंदा झाला. ऑक्टोबरअखेरपर्यंत ८ हजार ९८७ मिलिमीटर अर्थात १७६ टक्के  इतक्या पावसाची नोंद झाली. या पावसाने जिल्ह्यातील आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. 

जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांत वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा, या भागात सातत्याने पाऊस पडला. यामुळे या भागातील शेती हिरवीगार होती. परंतू दुष्काळी पट्ट्यात पावसाने दडी मारल्याने या भागात दुष्काळ होता. पिण्यासह शेतीच्या पाण्यासाठी इथला शेतकरी वणवण फिरत होता. पाऊस नसल्याने शिवार मोकळे पडले होते. परिणामी शेतातून काही हाती लागत नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला होता. परंतु दुष्काळीपट्ट्यातील शेती आणि जगण्याची आस शेतकऱ्यांनी सोडली नव्हती.

यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पावसाने दडी मारली. त्यानंतर मृग, हस्त ही नक्षत्रे कोरडी गेली. परिणामी यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली. जून महिना कोरडा गेला. आता पाऊस पडणार का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला होता. विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यात महापूर आला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. परंतु परतीचा पाऊस सुरू झाला, हा पाऊस संपूर्ण जिल्हाभर पडला. यामुळे दुष्काळी भागातील पाणीटंचाई कमी होऊ लागली. परंतू मॉन्सूनोत्तर पावसाने देखील सुरवात केली. त्यामुळे पावसाच्या आजपर्यंत केलेल्या नोंदी मागे पडल्या. 

जिल्ह्यात ४५२ मिलिमीटर म्हणजे ४८ टक्के इतका पाऊस २००३ मध्ये झाला होता. त्या वेळी मोठा दुष्काळ पडला होता.  त्यानंतर गेल्या वर्षी जिल्‍ह्यात ८० टक्के म्हणजे ४ हजार १३२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. या वर्षी सुद्धा दुष्काळाशी सामना करावा लागला होता. 

भूजल पातळीत वाढ 

कवठेमहांकाळ, तासगाव, जत, खानापूर, आटपाडी, मिरज पूर्वभाग या तालुक्यांतील भूजल पातळीत मोठी घट झाली होती. त्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. शिवारे मोकळी होती. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली. मात्र या वर्षीच्या पावसाने भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी कूपनलिका ओव्हरफ्लो झाल्या आहेत. यंदा दुष्काळीपट्ट्यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार नाही. 

गेल्या पाच वर्षांतील पाऊस 

वर्ष पाऊस (मि.मी) टक्केवारी
२०१४ ५६६३.७ ११६.८
२०१५ ३५७५.६  ७०.१
२०१६ ६०५७.४ ११९
२०१७ ५४९६.४ १०७.६
२०१८ ४१२४ ८०
२०१९ ८७८७ १७६

 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलननगर  ः गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर...
नांदेडमध्ये दूध दरप्रश्नी एल्गारनांदेड : रयत क्रांती संघटनेतर्फे शनिवारी (ता...
सांगलीत दूध रस्त्यावर ओतून, सरकारचा...सांगली  : ‘सरकारची माया आटली, दूध...
काटेपूर्णा प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठाअकोला  : जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक...
महायुतीचे वऱ्हाडात दूध दरप्रश्नी आंदोलनअकोला  ः दूध उत्पादकांनासरसकट १० रुपये...
दूध दरप्रश्नी कोल्हापुरात भाजपचा ‘...कोल्हापूर  : दुधाला प्रतिलिटर १० रुपये तर...
दूध दरप्रश्नी महायुतीचे नाशिक जिल्ह्यात...नाशिक  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दूध...
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी...
पुणे विभागीय आयुक्तपदाची सूत्रे सौरभ...पुणे: पुणे विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी...
गुणनियंत्रण संचालकपदी दिलीप झेंडेपुणे: राज्याच्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकपदी...
राज्य सरकारने कांदा उत्पादकांना अनुदान...नाशिक  : कांदा हे पीक दरवर्षी कोणत्या ना...
सोलापूर जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलन सोलापूर  ः दूध दरवाढीसाठी पुकारलेल्या एल्गार...
दोन बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन...अकोला ः या हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने...
शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर धडकेल...नगर  ः महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व...
... तर आम्ही मोठे आंदोलन करू ः...पुणे  ः राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर...
राज्यामध्ये येत्या काळात चांगल्या...कोकण, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्व...
डाळिंबावरील तेलकट डाग, मर, बुरशीजन्य...नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीकनांदेड : ‘‘कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी...
नांदेड जिल्ह्या अखेरच्या दिवशी...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत पीक...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...