agriculture news in marathi, record break tomato arrival at narayangaon, pune, maharashtra | Agrowon

नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी आवक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात शुक्रवारी (ता. ५) एक लाख तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. मागील तीन वर्षांत शुक्रवारी प्रथमच टोमॅटो क्रेटची उच्चांकी आवक झाली. प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला ५० रुपये ते ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. प्रामुख्याने टोमॅटो सॉस तयार करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी झाली. टोमॅटो खरेदी विक्रीतून शुक्रवारी उपबाजारात सुमारे दोन कोटी साठ लाख रुपयांची उच्चांकी उलाढाल झाली.

नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात शुक्रवारी (ता. ५) एक लाख तीस हजार टोमॅटो क्रेटची आवक झाली. मागील तीन वर्षांत शुक्रवारी प्रथमच टोमॅटो क्रेटची उच्चांकी आवक झाली. प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला ५० रुपये ते ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. प्रामुख्याने टोमॅटो सॉस तयार करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून टोमॅटोची खरेदी झाली. टोमॅटो खरेदी विक्रीतून शुक्रवारी उपबाजारात सुमारे दोन कोटी साठ लाख रुपयांची उच्चांकी उलाढाल झाली.

येथील टोमॅटो उपबाजारात यावर्षी एप्रिल महिन्यापासून टोमॅटोची आवक सुरू झाली. एप्रिल ते जून दरम्यान उपबाजारात रोज सुमारे ४० हजार ते ६० हजार दरम्यान टोमॅटो क्रेटची आवक होत होती. मात्र, मागील चार दिवसांपासून उपबाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. जुन्नर,आंबेगाव, शिरूर तालुक्‍यांतून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने पाणीटंचाईमुळे टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्‍यता होती. मात्र, टोमॅटोची वाढलेली आवक पहाता शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा वापर करून प्रतिकूल परिस्थितीत टोमॅटोचे उत्पादन घेतले असल्याचे दिसून आले आहे. ढगाळ वातावरण व बुरबुर पाऊस यामुळे टोमॅटोच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. यामुळे टोमॅटोला अपेक्षित भाव मिळत नाही.

टोमॅटोची खरेदी सॉस तयार करण्यासाठी केली जात असल्याने आवक वाढून सुद्धा टोमॅटोचे भाव स्थिर आहेत. येथील उपबाजार आवारात शुक्रवारी सकाळपासूनच टोमॅटोची आवक सुरू झाली. टोमॅटो क्रेट घेऊन आलेल्या वाहनांनी उपबाजार आवार खचाखच भरले होते. टोमॅटो क्रेट घेऊन आलेल्या वाहनांची उपबाजार आवाराच्या बाहेर मांजरवाडी रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर लांब रांग लागली होती. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बाजार समितीचे अधिकारी शरद घोंगडे व कर्मचारी प्रयत्नशील होते.

या बाबत श्री. घोंगडे म्हणाले, की उपबाजार आवारात शुक्रवारी टोमॅटोची उच्चांकी आवक झाली. सर्व शेतकऱ्यांकडील टोमॅटो व्यापाऱ्यांनी खरेदी केला. टोमॅटो खरेदीसाठी उपबाजार आवारात देशभरातून सुमारे दोनशे व्यापारी दाखल झाले आहेत. ज्युससाठी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने हलक्‍या प्रतीची टोमॅटोची सुद्धा विक्री झाली. शुक्रवारी दिवसभरात उपबाजारातून सुमारे १७० मालट्रकमधून टोमॅटो विक्रीसाठी विविध राज्यात रवाना झाला. खरेदी विक्रीच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी उपबाजार आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

व्यापारी जालिंदर थोरवे, सारंग घोलप म्हणाले, की बुरबुर पावसामुळे टोमॅटोला चिरा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. खरेदी केलेले टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी निवड करून टोमॅटो विक्रीसाठी आणावेत.


इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी, दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये घेवडा, वांग्यांच्या दरात...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
सोलापुरात भाज्यांना उठाव, वांगी,...सोलापूर ः कोरोनामुळे दहा दिवसांचा लॅाकडाऊन आहे....
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव  ः खानदेशात केळी दरांवर दबाव कायम आहे...
परभणीत भेंडी ८०० ते १२०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात कांद्याला १०० ते १००० रूपये दर सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर...
सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा...पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
अंदरसुल उपबाजारात कांदा विक्रीसाठी...नाशिक : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य...
नगरला फ्लॉवर, वांग्यांच्या दरात सुधारणा नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...