जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
अॅग्रोमनी
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन
देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. २०१९-२० च्या हंगामात २९७.५० दशलक्ष टन उत्पादन झाले होते. २०२०-२१ मध्ये ५.८४ दशलक्ष टनाने वाढून एकूण अन्नधान्याचे उत्पादन ३०३.३४ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे.
नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. २०१९-२० च्या हंगामात २९७.५० दशलक्ष टन उत्पादन झाले होते. २०२०-२१ मध्ये ५.८४ दशलक्ष टनाने वाढून एकूण अन्नधान्याचे उत्पादन ३०३.३४ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. तर मागील पाच वर्षांच्या उत्पादनाच्या सरासरीपेक्षा २४.४७ दशलक्ष टनांनी वाढ होईल, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या दुसऱ्या सुधारित अंदाजात म्हटले आहे.
देशात यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या हंगामात भाताचे उत्पादन ११२.४४ दशलक्ष टन उत्पादन होते. यंदा ७.८८ दशलक्ष टनाने वाढून १२०.३२ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज आहे. गहू उत्पादन १०९.२४ दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८.८१ टनांनी वाढ होईल. गेल्या हंगामात १००.४२ दशलक्ष टन उत्पादन होते. भरडधान्य उत्पादन यंदा ४९.३६ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात ४७.७५ दशलक्ष टन उत्पादन होते. तेलबिया उत्पादनात यंदा ४.०९ दशलक्ष टनांनी वाढ होऊन ३७.३१ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. तर कडधान्य उत्पादनात यंदा २.४३ दशलक्ष टनांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
खरिपात सोयाबीन उत्पादनात घट झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. पहिल्या अंदाजात देशात १४६.७४ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र दुसऱ्या सुधारित अंदाजात १३७.११ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे म्हटले आहे.
तूर उत्पादनात घट
यंदा खरिपात तुरीची लागवड वाढल्यानंतर देशात उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. केंद्रीय कृषी मंत्रालयाने पहिल्या अंदाजात ४.८२ दशलक्ष टन तूर उत्पादनाचा अंदाज होता. मात्र पिकाचे नुकसान झाल्याने यंदा ३.८८ दशलक्ष टन उत्पादन राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ३.८९ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.
हरभरा उत्पादनात वाढीचा अंदाज
रब्बी पेरणीला पोषक वातावरण असल्याने यंदा हरभरा उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पहिल्या अंदाजात ११ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे म्हटले होते. तर दुसऱ्या अंदाजात ११.६२ दशलक्ष टन उत्पादन होईल, असे म्हटले आहे. गेल्या वर्षी ११.०८ दशलक्ष टन उत्पादन होते. मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पिकांचे नुकसान होत असते. यंदाही अवकाळी पाऊस झाला. तसेच पुढील काळातही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नेमके उत्पादन किती राहील, हे तिसऱ्या अंदाजात स्पष्ट होईल.
देशातील पीकनिहाय उत्पादन (दशलक्ष टनांत)
- अन्नधान्य : ३०३.३४
- भात : १२०.३२
- गहू : १०९.२४
- भरडधान्ये : ४९.३६
- मका : ३०.१६
- कडधान्ये : २४.४२
- तूर : ३.८८
- हरभरा : ११.६२
- तेलबिया : ३७.३१
- भुईमूग : १०.१५
- सोयाबीन : १३.७१
- मोहरी : १०.४३
- ऊस : ३९७.६६
- कापूस : ३६.५४ (दशलक्ष गाठी)
- 1 of 32
- ››