देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज 

देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३.२२ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. २०१९-२० मध्ये देशात फळांचे १०२.०२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. तर एकूण फलोत्पादनाचे यंदा ३२६.५८ दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता आहे.
grapes
grapes

पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३.२२ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. २०१९-२० मध्ये देशात फळांचे १०२.०२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. तर एकूण फलोत्पादनाचे यंदा ३२६.५८ दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर गेल्या वर्षी ३२०.७७ दशलक्ष टनांवर उत्पादन पोहोचले होते, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या २०२०-२१ च्या पहिल्या फलोत्पादन अंदाजातून मिळाली. 

फलोत्पादन अंदाजात सरकार फळे, भाजीपाला, वनौषधी, फुले, मध, मसाले आदी पिकांच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर करते. सरकारने नुकतेच २०२०-२१ च्या हंगामातील पहिला अंदाज जाहीर केला. तर २०१९-२० मधील अंतिम उत्पादनाचा अहवाल प्रसिद्ध केला.  वर्षनिहाय फलोत्पादन आणि लागवड  (दशलक्ष टनांत) (लागवड दशलक्ष हेक्टरमध्ये) 

वर्ष लागवड उत्पादन 
२०१८-१९ २५.७४ ३११.०५ 
२०१९-२० २६.२२ ३१९.५७ 
२०२०-२१ २७.१७ ३२६.५८ 

गेल्या वर्षीच्या अंतिम अहवालातील महत्त्वाचे मुद्दे 

  • गेल्या वर्षी २०१८-१९ च्या तुलनेत फलोत्पादनात ३.१२ टक्क्यांनी वाढ झाली 
  • फळे, भाजीपाला, फुले आणि मसाले पिकांचे उत्पादन वाढले 
  •  फळांचे उत्पादन १०२.०३ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे 
  • २०१८-१९ मध्ये ९७.९७ दशलक्ष टन फळांचे उत्पादन होते 
  • भाजीपाल्याचे उत्पादन १८८.९१ दशलक्ष टन राहिल्याचा अंदाज आहे 
  • तर २०१८-१९ मध्ये १८३.१७ दशलक्ष टन भाजीपाला उत्पादन झाले 
  • देशात कांद्याचे २६.०९ दशलक्ष टन उत्पादन झाल्याचा अंदाज आहे 
  • तर २०१८-१९ मध्ये २२.८२ दशलक्ष टन कांदा झाला होता 
  • बटाट्याचे गेल्या वर्षी ४८.५६ दशलक्ष टन तर २०१८-१९ मध्ये ५० दशलक्ष टन उत्पादन झाले 
  • २०२०-२१ च्या हंगामातील पहिल्या अंदाजाची वैशिष्ट्ये 

  • यंदा फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती उत्पादनात वाढीची शक्यता 
  • मसाले पीक आणि फुलोत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे 
  • यंदा देशात १९३. ६१ दशलक्ष टन भाजीपाला उत्पादनाचा अंदाज आहे 
  • कांदा उत्पादन २६.२९ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे 
  • बटाटा उत्पादन ५३.११ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे 
  • हळद उत्पादनात घटीचा अंदाज  यंदाच्या पहिल्या अंदाजात देशातील हळद उत्पादनात घटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा ११.०६ लाख टन हळद उत्पादन अंदाज आहे. २०१९-२० मध्ये देशात ११.५३ लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर २०१८-१९ मध्ये देशात ९.६१ लाख टन हळद उत्पादन झाले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी तर २०१८-१९ च्या तुलनेत वाढ होण्याचा अंदाज आहे.  पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज (लाख टनांत)  ३३७.३३  केळी  ३६.३२  मोसंबी  ३१.८३  द्राक्ष  ४३.९४  पेरू  २११.२४  आंबा  ३१.०३  डाळिंब 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com