agriculture news in Marathi record horticulture production estimate in country Maharashtra | Page 2 ||| Agrowon

देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 मार्च 2021

देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३.२२ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. २०१९-२० मध्ये देशात फळांचे १०२.०२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. तर एकूण फलोत्पादनाचे यंदा ३२६.५८ दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता आहे.

पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३.२२ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. २०१९-२० मध्ये देशात फळांचे १०२.०२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. तर एकूण फलोत्पादनाचे यंदा ३२६.५८ दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर गेल्या वर्षी ३२०.७७ दशलक्ष टनांवर उत्पादन पोहोचले होते, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या २०२०-२१ च्या पहिल्या फलोत्पादन अंदाजातून मिळाली. 

फलोत्पादन अंदाजात सरकार फळे, भाजीपाला, वनौषधी, फुले, मध, मसाले आदी पिकांच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर करते. सरकारने नुकतेच २०२०-२१ च्या हंगामातील पहिला अंदाज जाहीर केला. तर २०१९-२० मधील अंतिम उत्पादनाचा अहवाल प्रसिद्ध केला. 

वर्षनिहाय फलोत्पादन आणि लागवड 
(दशलक्ष टनांत) (लागवड दशलक्ष हेक्टरमध्ये) 

वर्ष लागवड उत्पादन 
२०१८-१९ २५.७४ ३११.०५ 
२०१९-२० २६.२२ ३१९.५७ 
२०२०-२१ २७.१७ ३२६.५८ 

गेल्या वर्षीच्या अंतिम अहवालातील महत्त्वाचे मुद्दे 

  • गेल्या वर्षी २०१८-१९ च्या तुलनेत फलोत्पादनात ३.१२ टक्क्यांनी वाढ झाली 
  • फळे, भाजीपाला, फुले आणि मसाले पिकांचे उत्पादन वाढले 
  •  फळांचे उत्पादन १०२.०३ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे 
  • २०१८-१९ मध्ये ९७.९७ दशलक्ष टन फळांचे उत्पादन होते 
  • भाजीपाल्याचे उत्पादन १८८.९१ दशलक्ष टन राहिल्याचा अंदाज आहे 
  • तर २०१८-१९ मध्ये १८३.१७ दशलक्ष टन भाजीपाला उत्पादन झाले 
  • देशात कांद्याचे २६.०९ दशलक्ष टन उत्पादन झाल्याचा अंदाज आहे 
  • तर २०१८-१९ मध्ये २२.८२ दशलक्ष टन कांदा झाला होता 
  • बटाट्याचे गेल्या वर्षी ४८.५६ दशलक्ष टन तर २०१८-१९ मध्ये ५० दशलक्ष टन उत्पादन झाले 

२०२०-२१ च्या हंगामातील पहिल्या अंदाजाची वैशिष्ट्ये 

  • यंदा फळे, भाजीपाला, औषधी वनस्पती उत्पादनात वाढीची शक्यता 
  • मसाले पीक आणि फुलोत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे 
  • यंदा देशात १९३. ६१ दशलक्ष टन भाजीपाला उत्पादनाचा अंदाज आहे 
  • कांदा उत्पादन २६.२९ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे 
  • बटाटा उत्पादन ५३.११ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे 

हळद उत्पादनात घटीचा अंदाज 
यंदाच्या पहिल्या अंदाजात देशातील हळद उत्पादनात घटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा ११.०६ लाख टन हळद उत्पादन अंदाज आहे. २०१९-२० मध्ये देशात ११.५३ लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर २०१८-१९ मध्ये देशात ९.६१ लाख टन हळद उत्पादन झाले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी तर २०१८-१९ च्या तुलनेत वाढ होण्याचा अंदाज आहे. 

पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज (लाख टनांत) 
३३७.३३ 
केळी 
३६.३२ 
मोसंबी 
३१.८३ 
द्राक्ष 
४३.९४ 
पेरू 
२११.२४ 
आंबा 
३१.०३ 
डाळिंब 


इतर अॅग्रो विशेष
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...