Record income of 11 lakh quintals of onion in 25 days
Record income of 11 lakh quintals of onion in 25 days

कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख क्विंटल आवक

लिलावाचे कामकाज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत सापडले होते. त्यानंतर २४ मेपासून बाजारात आवक सुरू झाल्यानंतर २५ दिवसांत लासलगाव बाजार समितीत ११ लाख ४३ हजार १४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली.

नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील लिलावाचे कामकाज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत सापडले होते. त्यानंतर २४ मेपासून बाजारात आवक सुरू झाल्यानंतर २५ दिवसांत लासलगाव बाजार समितीत ११ लाख ४३ हजार १४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. यातून १७१ कोटी ४७ लाख ११ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ते २३ मे २०२१ अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाउनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांमधील शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. त्यानंतर २४ मेपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. २४ मे ते २० जून या कालावधीत लासलगाव बाजार समितीच्या लासलगाव मुख्य आवार व निफाड व विंचूर उपबाजार आवारात ११ लाख ४३ हजार १४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. कांदा विक्रीतून १७१ कोटी ४७ लाख ११ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली आहे.

आवकेत ५ लाख क्विंटलची वाढ  मागील वर्षी याच कालावधीत ६ लाख २५ हजार ७४७ क्विंटल कांदा आवक होऊन ५० कोटी १८ लाख ४९ हजार ९४ रुपयांची उलाढाल झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५ लाख १७ लाख ३९४ क्विंटल कांद्याची जादा आवक झाली असून, त्यातून १२१ कोटी २८ लाख ६२ हजार ४०६ इतक्या रकमेची जादा उलाढाल झाली आहे. शिवाय सरासरी बाजारभावात देखील ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com