Agriculture news in Marathi Record income of 11 lakh quintals of onion in 25 days | Agrowon

कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख क्विंटल आवक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 जून 2021

लिलावाचे कामकाज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत सापडले होते. त्यानंतर २४ मेपासून बाजारात आवक सुरू झाल्यानंतर २५ दिवसांत लासलगाव बाजार समितीत ११ लाख ४३ हजार १४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली.

नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील लिलावाचे कामकाज कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत सापडले होते. त्यानंतर २४ मेपासून बाजारात आवक सुरू झाल्यानंतर २५ दिवसांत लासलगाव बाजार समितीत ११ लाख ४३ हजार १४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. यातून १७१ कोटी ४७ लाख ११ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ते २३ मे २०२१ अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाउनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांमधील शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. त्यानंतर २४ मेपासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. २४ मे ते २० जून या कालावधीत लासलगाव बाजार समितीच्या लासलगाव मुख्य आवार व निफाड व विंचूर उपबाजार आवारात ११ लाख ४३ हजार १४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली. कांदा विक्रीतून १७१ कोटी ४७ लाख ११ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली आहे.

आवकेत ५ लाख क्विंटलची वाढ 
मागील वर्षी याच कालावधीत ६ लाख २५ हजार ७४७ क्विंटल कांदा आवक होऊन ५० कोटी १८ लाख ४९ हजार ९४ रुपयांची उलाढाल झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५ लाख १७ लाख ३९४ क्विंटल कांद्याची जादा आवक झाली असून, त्यातून १२१ कोटी २८ लाख ६२ हजार ४०६ इतक्या रकमेची जादा उलाढाल झाली आहे. शिवाय सरासरी बाजारभावात देखील ७०० रुपयांनी वाढ झाली आहे.


इतर बातम्या
पशुचिकित्सा व्यवसायी आंदोलनाने पशुसेवा...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती जिल्ह्यात १८३ जणांना ...अमरावती ः २०१७-१८ मध्ये फवारणीदरम्यान विषबाधेत...
पीकविम्यातील सूचनांचा केंद्राकडून...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेत विमा कंपन्यांच्या...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साडेअकरा हजार...मुंबई ः राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे...
कोकणात काही ठिकाणी मुसळधार पुणे : कोकणात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस...
निविष्ठा वितरणातील अडचणींत लक्ष घालणार...पुणे ः राज्यात निविष्ठा वितरणात अडचणी येत असल्यास...
मराठवाड्यात सव्वा लाख हेक्टरवरील...औरंगाबाद : मराठवाड्यातील सात जिल्ह्यांतील १००३...
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी...गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात...
साखरेचे किमान विक्री मूल्य तातडीने...कोल्हापूर : सध्या साखर उद्योग संकटात असून,...
वर्धा : पीककर्जप्रकरणी १६ बॅंकांना नोटीसवर्धा : पीककर्ज वाटपात दरवर्षी प्रमाणे या वर्षी...
आपद्‌ग्रस्त कुटुंबांना मिळणार पाच हजाररत्नागिरी : अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा चिपळूण,...
पूरबाधित कर्जदारांना सहकार्याची भूमिका...कोल्हापूर : जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व...
सेंद्रिय शेतीचे तंत्र अंगीकारा ः डॉ. ढवणबदनापूर, जि. जालना : अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित...
अकोल्यात ३७ हजार हेक्टरचे पंचनामेअकोला : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या झालेल्या...
रुग्णालयांच्या सुरक्षेचा तपशील दाखल करा...मुंबई : रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत...
परभणीत पशुधन पदविकाधारकांचे आंदोलनपरभणी ः पशुधन पदवीधारकांची जिल्हास्तरावर नोंदणी...
सातारा :बेसुमार वृक्षतोडीमुळे कोयनेचे...सातारा : कोयना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात...
‘महसूल’ लोकाभिमुख करा ः आयुक्त गमेनाशिक : प्रशासनात चांगले काम केल्यास समाज देवत्व...
मोहोळ, उत्तर सोलापुरात बिबट्याची दहशत...सोलापूर ः चिंचोली, शिरापूर (ता. मोहोळ) अकोलेकाटी...
लासलगाव बाजार समितीत टोमॅटो लिलावास...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प.पू...