Agriculture news in Marathi Record inflow of soybean in Risod market | Agrowon

रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवक

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून बुधवारी (ता. २८) उशिरापर्यंत चालू असलेला लिलाव थांबवल्यामुळे काही काळ शेतकरी आक्रमक झाले होते. प्रशासनाने मध्यस्थी करून गुरुवारी (ता. २९) येथील बाजारातील कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले.

वाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून बुधवारी (ता. २८) उशिरापर्यंत चालू असलेला लिलाव थांबवल्यामुळे काही काळ शेतकरी आक्रमक झाले होते. प्रशासनाने मध्यस्थी करून गुरुवारी (ता. २९) येथील बाजारातील कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले.

सध्या बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. बुधवारी रिसोड बाजार समितीत सुमारे १२ हजार पोत्यांची विक्रमी आवक झाली होती. पहिल्यांदाच एवढी आवक झाल्याने हे आवार सर्वत्र भरून गेले. लिलाव रात्री उशिरापर्यंत सुरू होता. परंतु अंधारामुळे या कामात अडचणी येत होत्या. अखेरीस लिलाव थांबविण्यात आले.

काही शेतकऱ्यांनी संपूर्ण मालाचा लिलाव करण्याचा आग्रह धरला. हमाल लिलाव झालेल्या मालाचे मोजमाप करीत असताना शेतकऱ्यांनी जोपर्यंत आमच्या मालाचा लिलाव होत नाही तोपर्यंत मोजमाप थांबवा असे म्हणून काही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी हमाल शेतकरी व्यापारी यांच्यामध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. जवळपास चार हजार क्विंटल सोयाबीनचा लिलाव बुधवारी होऊ शकला नव्हता. त्यामुळे गुरुवारी सकाळीच लिलाव पूर्ववत करू, असे बाजार समितीचे सचिव विजयराव देशमुख यांनी सांगितले.

त्यानुसार गुरुवारी सकाळीच कामकाज सुरू झाले. सोयाबीनची आवक अधिक असल्याने गुरुवारचा हळद बाजार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी बाजारात सोयाबीनचा दर कमी निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर मात्र उमटला होता.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
एफआरपीप्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील बैठक...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही...
नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा...नांदेड : खरिपातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी...
शहीद नितीन भालेराव अनंतात विलीननाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलिस...
डाळिंब, आंब्याच्या विम्यासाठी ३१...नाशिक : ‘‘राज्य शासनाच्या पुनर्रचित हवामान आधारित...
परभणी, पाथरी, गंगाखेडमधील कापसाची...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
परभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी...परभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान...
खानदेशात रब्बीसाठी आवर्तनांची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात सर्वच प्रकल्पांमधील जलसाठे मुबलक...
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विशेष पथके...औरंगाबाद : औरंगाबाद व बीड जिल्ह्यात बिबट्याच्या...
जळगाव जिल्हा परिषदेत रिक्त पदांमुळे...जळगाव : ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा...
अंबड तालुक्यात चार ठिकाणी कापूस खरेदी...अंबड, जि. जालना : तालुक्यात चार ठिकाणी कापूस...
पपई उत्पादकांना खर्चही निघेनाअकोला : पारंपरिक पिकांची चाकोरी सोडत शेतकरी...
मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक...औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात...
खडकपूर्णा धरणाचे आवर्तन अखेर सुरूबुलडाणा : देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना...
...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ....अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत...
मक्यावर अमेरिकन लष्करी अळीनगर  : नगर तालुक्यातील पिंपळगाव वाघा परिसरात...
पुण्यात भात काढणी अंतिम टप्प्यातपुणे  : दिवाळी सणामुळे भात पट्यात अनेक...
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणीकडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू...
सांगलीत एफआरपीची प्रतीक्षासांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ऊस...
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार...नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी...