नाशिक विभागात विक्रमी कांदा लागवडीचा अंदाज

नाशिक : चालू वर्षी पर्जन्यमान समाधानकारक असल्याने कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.
नाशिक विभागातील विक्रमी कांदा लागवडीचा अंदाज
नाशिक विभागातील विक्रमी कांदा लागवडीचा अंदाज

नाशिक : चालू वर्षी पर्जन्यमान समाधानकारक असल्याने कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नाशिक विभागात  डिसेंबरअखेर ९ हजार ५५० हेक्टरवर  कांदा लागवडी अधिक आहेत. असे विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या माहितीवरून समोर आले आहे. त्यामुळे विक्रमी कांदा लागवडीचे संकेत आहेत.  

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यांपर्यंत अतिवृष्टीमुळे कांदा लागवडी लांबणीवर गेल्या. मात्र चालू वर्षी लागवडींना डिसेंबर महिन्यातच वेग आल्याचे चित्र आहे. विभागात नाशिक जिल्ह्यामध्ये लागवडी वाढल्या आहेत. चालू वर्षी बाजारभावात वाढ झाल्याने अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. धुळे व जळगाव जिल्ह्यात लागवडी चालू वर्षी घटल्याचे दिसून येते. तर नंदुरबार जिल्ह्यात लागवडी शून्यावरच आहेत. 

कांदा बियाण्यांचा तुटवडा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महागडे बियाणे उपलब्ध करून रोपवाटिका तयार केल्या. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन रोपवाटिका तयार केल्या. त्यामुळे नुकसान टळले. रोपे आता लागवडीसाठी तयार आहेत. मात्र मजूर मिळत नसल्याने लागवडी आठवडाभर उशिरा होत आहे. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी लागवडीचा कल असतो. मात्र रोपे शिल्लक असल्याने लागवडी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू राहतील, असा अंदाज आहे. 

रोपवाटिकांची काळजी 

बियाणे महाग असल्याने रोपवाटिकेत बियाणे टाकल्यापासून विशेष काळजी घेण्यात आली. त्यामुळे आता रोपे उपलब्ध करून लागवडी पूर्ण करण्यावर भर दिसून येत आहे. रोपवाटिकांचे व्यवस्थापन करताना काही शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करताना जैविक निविष्ठांचा वापर केला. गादी वाफ्यावर रोपांची निर्मिती केल्याने मरतुक कमी होऊन रोपांची उपलब्धता झाली, असे कांदा व द्राक्ष संशोधन केंद्राचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. राकेश सोनवणे यांनी सांगितले. 

चालू वर्षी ऑक्टोबरअखेर रोपवाटिका उत्कृष्ट आहेत. रोपांची उपलब्धता मुबलक झाल्याने लागवडी वाढत आहेत.  - पंडित वाघ, कांदा उत्पादक, बार्डे, ता. कळवण

मागील वर्षाचा कटू अनुभव घेता, पावसाची परिस्थिती पाहून रोपवाटिका तयार केल्या. सुरवातीला बियाण्याची टंचाई भासली. मात्र तुलनेत रोपांची उपलब्धता अधिक असल्याने लागवडी मोठ्या प्रमाणावर होत आहेत.  - संदीप कोकाटे, कांदा उत्पादक, साताळी, ता. येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com