Agriculture news in Marathi Record price of Rs. 1600 for banana | Agrowon

केळीला विक्रमी १६०० रुपये दर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 एप्रिल 2021

खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर चांगला उठाव उत्तर भारतातून आहे. दर्जेदार केळीची आवक बऱ्यापैकी असून, दर विक्रमी स्थितीत म्हणजेच १६११ ते १६२५ रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत.

जळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर चांगला उठाव उत्तर भारतातून आहे. दर्जेदार केळीची आवक बऱ्यापैकी असून, दर विक्रमी स्थितीत म्हणजेच १६११ ते १६२५ रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला सरबोजा किंवा ऑनचे (जादा) दरही मिळत आहेत.

केळीची निर्यात परदेशात १३ कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यामुळे मार्चमध्येच केळी दरात चांगली सुधारणा झाली. मार्चअखेरीस दर १५०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले. सध्या एकट्या रावेरातून (जि. जळगाव) रोज आठ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची आखातातील इराण, इराक, बहरीन, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान आदी भागांत निर्यात होत आहे. यातच मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त केळीला उत्तर भारतातील प्रमुख खरेदीदारांकडूनही मागणी आहे.  दिल्लीच्या आझादपूर येथील बाजारात केळीला चांगला उठाव आहे. परिणामी, केळीच्या दरात चांगली तेजी आली आहे.

सध्या खानदेशात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल,
मुक्ताईनगर व नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा व शहादा तालुक्यांत केळीची काढणी सुरू आहे. रावेर, मुक्ताईनगर, शहादा, यावल भागांत निर्यातक्षम केळीचे उत्पादन अधिक होत आहे. २२ ते २५ च्या रासची केळी या भागात उपलब्ध आहे. या केळीला अधिकचे दर मिळत आहेत. रावेर, यावल व मुक्ताईनगरातून मध्य प्रदेशातील खरेदीदार देखील केळीचा पुरवठा करून घेत आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरात दर्जेदार केळीला या हंगामात प्रथमच ऑनचे दरही मिळत आहेत.

दररोज दोन कंटेनर केळीची निर्यात
खानदेशातून सध्या रोज २६० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीचा पुरवठा होत आहे. यातील कमाल केळीची पाठवणूक उत्तर भारतात होत आहे. शहादा व तळोदा भागातून रोज दोन कंटेनर केळीची परदेशात निर्यात होत आहे, अशी माहिती मिळाली.

 


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकूनजळगाव :  खानदेशात काबुली हरभऱ्याचे दर यंदा...