agriculture news in Marathi record rice export possibility Maharashtra | Agrowon

तांदळाच्या विक्रमी निर्यातीची यंदा शक्‍यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जानेवारी 2021

देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन होण्याची शक्‍यता असल्याने यंदाच्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) देशातून विक्रमी १४० लाख टन तांदळाची निर्यात अपेक्षित आहे.

कोल्हापूर : देशात यंदा भाताचे चांगले उत्पादन होण्याची शक्‍यता असल्याने यंदाच्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) देशातून विक्रमी १४० लाख टन तांदळाची निर्यात अपेक्षित आहे. थायलंड व व्हिएतनाम या भात उत्पादक देशात यंदा दुष्काळी परिस्थिती बनल्याने या देशांत तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. याचा फायदा भारतीय तांदळाला होणार असल्याचे तांदूळ उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी भारतातून केवळ ९९ लाख टन इतकी निर्यात झाली होती. ती गेल्या आठ वर्षांत कमी होती. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४१ लाख टनांची वाढ होण्याचा कयास आहे. भारत मुख्यत्वे इराण, इराक व सौदी अरेबिया या देशांना बासमती तांदळाची निर्यात करतो. तर प्रामुख्याने बांगलादेश, नेपाळ, बेनिन आणि सेनेगल या राष्ट्रांना नॉन बासमती तांदूळ निर्यात करतो. परंतु या वेळी आफ्रिकन देशांकडूनही नॉन बासमती तांदळाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे.

थायलंड, व्हिएतनाममधील कमी पावसाचा भारताला लाभ
जगातील सर्वांत मोठ्या तांदूळ निर्यातदार देशांच्या यादीत भारताच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडमध्ये या वर्षी अत्यल्प पाऊस झालेला आहे. त्यामुळे तेथील तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटेल. परिणामी, थायलंडची जागतिक बाजारातील तांदळाची निर्यात त्यांच्या मागील अनेक वर्षांतील निर्यातीपेक्षा खूप कमी म्हणजेच ६० ते ६५ लाख टन इतकी होईल. त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत थायलंड पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्हिएतनाममध्येही प्रमुख तांदूळ उत्पादित क्षेत्रात असमाधानकारक पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे तेथीलही तांदूळ उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. याचा अनुकूल परिणाम भारतीय तांदळाच्या मागणीवर होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ टक्के निर्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया
यंदा भारतीय तांदळाला चांगले दिवस आले आहेत. स्पर्धात्मक देशात उत्पादन घटल्याने आपल्या देशातील तांदळाला मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. सकारात्मक परिणामामुळे यंदा निर्यातीत उच्चांक होईल, असे सध्याचे चित्र आहे. या निर्यात वाढीमुळे देशात परकीय चलन मोठ्या प्रमाणावर वाढेल.
- राजेश शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम)


इतर अॅग्रोमनी
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...
बाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...
द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के घट शक्य नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी...
शेतमाल बाजारातील सुधारणा कायम राहीलवॉशिंग्टन ः शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजार यंदा...
अर्जेंटिनात महागाई भडकलीब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...
सोयाबीन पाच हजारांवरपुणे ः उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली...
तूर टप्प्‍याटप्प्याने विकण्याचे आवाहन पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात ३० टक्‍...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ...
शेतजमीन भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...नवी दिल्ली ः शेतजमिनी भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...
‘व्हेजनेट’वर होणार ४३ पिकांची नोंदणी नागपूर ः निर्यातीसह देशांतर्गत ग्राहकांना...
शेती, संलग्न क्षेत्रांच्या निधीत कपात पुणे ः केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा शेती आणि संलग्न...
बियाणे उद्योगाला जीएसटी परताव्याची...पुणे : अंतिम उत्पादनावर जीएसटी नसला तरी...