agriculture news in Marathi record sugar export possible this year Maharashtra | Page 2 ||| Agrowon

साखर निर्यातीचा यंदा विक्रम? 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

साखर निर्यातीची गती पाहता यंदा निर्यातीचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. कारखाने जूनमध्येच ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट गाठतील, अशी शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली. 

कोल्हापूर: साखर निर्यातीची गती पाहता यंदा निर्यातीचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. कारखाने जूनमध्येच ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट गाठतील, अशी शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली. 

गेल्या वर्षीपासून साखर निर्यातीत भारताने घोडदौड सुरू ठेवली आहे. ती यावर्षी ही कायम राहण्याची शक्यता आहे. निर्यातीची सद्यःस्थिती पाहता यंदा गेल्या वर्षी पेक्षाही जास्त निर्यात होऊ शकते असा अंदाज आहे. आतापर्यंत तब्बल ५० लाख टन साखरेचे निर्यात करार झाले आहेत. गेल्यावर्षी ५९ लाख टन साखर निर्यात झाली होती. 

देशातील हंगाम अजूनही सुरू असल्याने साखर उत्पादन होतच आहे. यामुळे अनेक कारखान्यांनी साखर निर्यातीला प्राधान्य दिले आहे. यंदा शासनाने साखर निर्यात योजनेत ६० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. ब्राझील आणि थायलंड या प्रमुख साखर उत्पादक देशात अनपेक्षितपणे साखर उत्पादन घटत आहे. ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी ३८० लाख टन साखर तयार झाली होती. यंदा ३०० लाख टनांपर्यंत साखर उत्पादित होईल, असा तेथील साखर उद्योगाचा अंदाज आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस व साखर उत्पादनात घट अपेक्षित आहे.

तर दुसरीकडे थायलंडमधील ऊस उत्पादन १२० लाख टनांवरून ७० लाख टनांवर येण्याची शक्यता आहे. या प्रमुख देशातील विपरीत परिस्थिती मुळे साखरेची चणचण भासेल असे वातावरण जागतिक बाजारपेठेत तयार होत आहे. याचा फायदा भारतीय साखरेला होण्याची शक्यता आहे. याची फलश्रुती म्हणून निर्यात करारात सातत्याने वाढ दिसते दरात ही वाढ अपेक्षित आहे.

निर्यात योजनेतून मिळणारे अनुदान आणि जागतिक बाजारपेठेत मिळणारे दर याचा विचार केल्यास साखर निर्यात करणे कारखान्यांना फायदेशीर ठरणार असल्याने कारखाने निर्यातीला प्रतिसाद देत आहेत. यामुळेच कराराची गती वाढल्याचे चित्र आहे. 

देशांतर्गत मागणी कमी 
भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी साखर उत्पादन यंदा वाढले. देशात आतापर्यंत ३०० लाख टन साखर उत्पादित झाली. पण कोविडमुळे देशातील बहुतांशी राज्यातील बाजारपेठा बंद असल्याने मोठ्या उद्योगाकडून साखरेची मागणी कमी राहिली. याचा परिणाम देशांतर्गत बाजारात साखर शिल्लक राहण्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्यातीला असलेले अनुकूल वातावरण समाधानकारक ठरत असल्याची माहिती साखर उद्योगाच्या सूत्रांनी दिली 
 


इतर अॅग्रो विशेष
कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत मॉन्सून...
राज्यात ठिकठिकाणी धुव्वांधार पुणे : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे...
दूध उत्पादकांचे उत्पन्न पोचेल २५...गायी म्हशींमधील लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रांच्‍या...
धरणक्षेत्रांत पावसाचा जोर पुणे : तीन दिवसांपासून कोकणसह, सह्याद्रीच्या...
सरळ कापूस वाण बियाण्यांचा खानदेशात...जळगाव : खानदेशात केळी पट्ट्यात सरळ वाणांची...
मॉन्सूनची वाटचाल सुरूच पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर...
कृषी सचिव एकनाथ डवले रमले शिवारात नांदेड : राज्याचे कृषी सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे...
विद्यापीठाच्या कांदा बियाणे विक्रीत ‘...नाशिक/नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बियाणे...
कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पूरक...पुणे ः सहकार विकास महामंडळाबरोबर झालेल्या...
कोकण, घाटमाथा, विदर्भात अतिवृष्टीचा...पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार...
दूध उत्पादकांना रोज १४ कोटींचा फटका नगर ः लॉककाडउनमुळे दुधाची मागणी घटल्याचे सांगत...
महिला गटाने रुजविले शेती, पूरक...कुशिवडे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आणि म्हाप्रळ...
डिजिटल सात-बारासाठी ५१ बँकांनी केले...पुणे : शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी डिजिटल...
कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या...
‘डीएससी’अभावी हजारो कोटी पडून पुणे ः पंधराव्या वित्त आयोगाचा पाच हजार कोटी...
घृष्णेश्‍वर कंपनीची सातत्यपूर्ण उंचावती...एका गटापासून सुरुवात करून विविध उपक्रम, त्यात...
२५ एकरांत शेडनेट्‍स, आदिवासींची सामूहिक...नगर जिल्ह्यात म्हाळुंगी (ता. अकोले) परिसरातील...
विदर्भात पावसाचा जोर पुणे : मॉन्सून उत्तरेकडे सरकत असताना राज्यातील...
लिंबे तोडणीलाही महाग अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका...
मॉन्सून जोमात, पीककर्ज कोमात पुणे ः दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना...