Agriculture News in Marathi Recovery of electricity bill arrears If not, the state is in darkness | Agrowon

वीजबील थकबाकीची वसुली  न झाल्यास राज्य अंधारात 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलाची थकबाकी वसूल झाली नाही तर राज्य अंधारात जाईल, असा गंभीर इशारा दिला आहे. वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. 

मुंबई : ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलाची थकबाकी वसूल झाली नाही तर राज्य अंधारात जाईल, असा गंभीर इशारा दिला आहे. वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे. त्या संदर्भात महावितरणकडून सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये आधीच्या सरकारने बाकी ठेवलेल्या वसुली बाबतही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी यावर काय उपाययोजना करता येतील, या बाबत अहवाल तयार करण्यास सांगितले आहे, अशी माहिती नितिन राऊत यांनी दिली. 

थकबाकी आणि वसुलीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. तसेच थकबाकीकडे गांभीर्याने न पाहिल्यास राज्य अंधारात जाईल, अशा इशाराही नितीन राऊत यांनी दिला आहे. ऊर्जा विभागातील मोठी वसुली अद्याप रखडली असल्याचेही त्यांनी सांगितले. राऊत म्हणाले, ‘‘भाजप सरकारच्या कार्यकाळात थकीत असलेली बिलांची रक्कम आताच्या थकीत बिलात आहे. आधीच्या सरकारने थकबाकीचा डोंगर वाढवून ठेवला आहे. आता कोरोना, अतिवृष्टी या परिस्थितीमुळे वसुली करता आली नाही. त्यामुळे महावितरणवरील भार अधिक वाढला आहे. महावितरण आर्थिकदृष्ट्या कसे नफ्यात येईल, यावर विचार करण्याची गरज आहे.’’  


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...