Agriculture news in marathi Recovery of FRP from confiscated sugar sale of Rawalgaon | Agrowon

`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘एफआरपी’ची वसुली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव कारखान्यामार्फत गाळप हंगाम २०२०-२१ मधील थकीत एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम अदा केली नाही.

नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव कारखान्यामार्फत गाळप हंगाम २०२०-२१ मधील थकीत एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना रक्कम अदा केली नाही. त्यामुळे थकीत रक्कम अदा करण्यासाठी कारखान्यातील जप्त साखर व बगॅसची विक्री करून वसुली करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली. 

‘‘जप्त केलेल्या ७६ हजार ५१२ क्विंटल साखर व १० मे.टन.बगॅसची जाहीर टेंडर नोटीस ही मंगळवार २७ जुलै रोजी सकाळी १० ते १ या कालावधीत कारखाना स्थळावर पाहण्यासाठी असेल. तर गुरुवार २९ जुलै रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत टेंडर फॉर्म तहसील कार्यालय, मालेगाव येथे देण्यात येतील. तरी इच्छुक फर्म, संस्थांनी साखरेसाठी ५ लाखांचा, तर बगॅससाठी १ हजाराचा तहसीलदार मालेगाव यांच्या नावे डिमांड ड्राफ्टसह टेंडर फॉर्म तहसील कार्यालयातील बंद पेटीत टाकावयाचा आहे. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी १ वाजता बंद पेटीतील टेंडर फॉर्म उघडण्यात येतील. साखर व बगॅस विक्रीचा निर्णय घेण्यात येईल’’, असेही राजपूत यांनी सांगितले. 

जप्त वस्तूवरील राज्य व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचा कर व वाहतुकीचा खर्च खरेदीदाराला स्वतः: करावा लागेल. टेंडर मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार तहसील कार्यालयाने राखून ठेवला आहे. कार्यालयाच्या अटी व शर्ती खरेदीदारांवर बंधनकारक राहतील, असे आवाहन राजपूत यांनी केले.


इतर बातम्या
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...