Agriculture news in Marathi, Recovery of police from agricultural commuters | Agrowon

शेतीमाल वाहतूकदारांची वाहने अडवीत पोलिस करतात वसुली

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच हवालदिल शेतकऱ्यांकडून वाहतूक पोलिस जबरी वसुली करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतीमाल विक्रीसाठीची वाहने अडवीत पोलिसांकडून ही वसुली केली जात आहे. 

अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसाच्या नुकसानीमुळे आधीच हवालदिल शेतकऱ्यांकडून वाहतूक पोलिस जबरी वसुली करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतीमाल विक्रीसाठीची वाहने अडवीत पोलिसांकडून ही वसुली केली जात आहे. 

दुर्गम मेळघाटात हा आदिवासीबहुल भाग आहे. या भागातील शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याने कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कपाशी, तूर, सोयाबीन या सारखी पीके मेळघाटातील शेतकऱ्यांव्दारे घेतली जातात. यावर्षी ओल्या दुष्काळामुळे पीकाच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. एकरी दहा क्‍विंटल अपेक्षा असलेल्या सोयाबीनने तर शेतकऱ्यांना पुरते निराश केले. 

काही शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड क्‍विंटलचाही उतारा मिळाला नाही.कपाशीचीस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. अशा स्थितीत काही अंशी निघालेला शेतीमाल विकून रबी हंगाम तसेच कुटुंबांच्या गरजा भागविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. कमी खर्चात वाहन करुन हा शेतीमाल अचलपूर बाजार समितीपर्यंत शेतकरी नेत आहेत. परंतू मेळघाटातील घाटवळणावर अशी वाहने वाहतूक पोलिसांकडून अडविण्यात येत या वाहनधारकांकडून वसुलीचे काम होत असल्याचा आरोप आहे. 

पोलिसांकडून नाहक सुरू असलेल्या या छळवादाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू तसेच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना भेटत या त्रासापासून मुक्‍ती देण्याची मागणी केली आहे. मेळघाटातून शेतीमाल आणणाऱ्या वाहनधारकांकडून १०० ते ५००० रुपयांची वसुली केली जात असल्याचा आरोप आहे. ही लुबाडणूक थांबविण्याची मागणी हिरामण बेलसरे, विष्णू खडके, मारुती सालोमन, देविदास खडके, सीताराम सावलकर, श्रीराम बेलसरे यांनी केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
जळगावात आले २२०० ते ४८०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...